Sanjiv Goenka Profile : आयपीएल २०२४ च्या ५७ व्या सामन्यात (८ मे) सनरायझर्स हैदराबादने लखनौ सुपर जायंट्सचा १० गडी राखून पराभव केला. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर लखनौने प्रथम खेळताना १६५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात हैदराबादच्या फलंदाजांनी ९.४ षटकात बिनबाद १६७ धावा करत सामना जिंकला.
लखनौच्या पराभवानंतर या फ्रेंचायझीचे मालक संजीव गोएंका हे चांगलेच संतापलेले दिसले. सामन्यानंतर त्यांनी लखनौचा कर्णधार केएल राहुल आणि आणि हेड कोच जस्टीन लँगर यांना भर मैदानात झापले. यावेळी गोएंका यांच्या चेहऱ्यावरचा राग स्पष्ट दिसत होता. त्याच वेळी, लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल शांतपणे संजीव गोयंका यांची बोलणी खात होता.
पण लखनऊ सुपर जायंट्सचे मालक संजीव गोएंका यांची प्रोफाइल तुम्हाला माहिती आहे का? तसेच संजीव गोयंका यांची एकूण संपत्ती किती आहे? याबाबत तुम्हाला माहीत आहे का?
संजीव गोयंका यांचा जन्म कोलकाता येथे झाला, ते तेथेच वाढले. यानंतर त्यांनी प्रसिद्ध सेंट झेवियर्स कॉलेजमधून बी.एस्सी. कॉमचे शिक्षण घेतले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, संजीव गोएंका यांची एकूण नेटवर्थ अंदाजे ३.४ अब्ज डॉलर्स आहे.
याशिवाय यावर्षी फोर्ब्सने आपल्या यादीत संजीव गोएंका यांना ९४९ व्या क्रमांकावर ठेवले आहे. संजीव गोयंका हे RPSG कंपनीचे अध्यक्ष आहेत.
आयपीएल टीम लखनऊ सुपर जायंट्स व्यतिरिक्त संजीव गोयंका हे प्रसिद्ध फुटबॉल टीम मोहन बागानचे मालक आहेत. संजीव गोएंका यांच्या RPSG कंपनीत ५० हजारांहून अधिक कर्मचारी आहेत. भारताव्यतिरिक्त ही कंपनी जगभरात कार्बन ब्लॅक, पॉवर, आयटी, रिटेल उत्पादने, मीडिया आणि मनोरंजन, क्रीडा, शिक्षण आणि इन्फ्रास्ट्रक्चर यांमध्ये व्यवसाय करते. संजीव गोयंका यांनी IIT खरगपूरचे बोर्ड सदस्य म्हणूनही काम केले आहे.
लखनौ-हैदराबाद सामन्यानंतर लखनौ, दिल्ली आणि सीएसके समान १२ गुण आहेत. पण नेट रनरेटच्या बाबतीत लखनौची अवस्था खूपच वाईट झाली आहे.
परिस्थितीत केएल राहुल आणि त्याच्या सहकाऱ्यांसाठी प्लेऑफचा मार्ग कठीण झाला आहे. यामुळेच सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या खराब कामगिरीमुळे एलएसजी फ्रँचायझीचे मालक संजीव गोयंका संतापले आणि त्यांच्या संतापाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.