इंडियन प्रीमियर लीग २०२४ मध्ये आज गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना होणार आहे. उभय संघांमधील हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. गुजरात आणि सीएसके हे दोन्ही संघ अजूनही प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या शर्यतीत आहेत, परंतु दोघांनाही त्यांचे पुढील सर्व साखळी सामने जिंकावे लागतील आणि इतर सामन्यांच्या निकालांवरही अवलंबून राहावे लागेल.
गुजरात टायटन्स संघ सध्या गुणतालिकेत ८ गुणांसह १०व्या स्थानावर आहे, तर चेन्नई सुपर किंग्ज ११ सामन्यांत ६ विजयांसह चौथ्या स्थानावर आहे.
दरम्यान, गुजरात असो की सीएसके, दोन्ही संघांकडे तगड्या खेळाडूंची फौज आहे. अशा परिस्थितीत या सामन्यासाठी ड्रीम-इलेव्हन (Dream 11 todays match team prediction) निवडणे निश्चितच खूप कठीण काम असेल, पण येथे आम्ही तुमची काही प्रमाणात मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत.
गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील या सामन्यासाठी तुम्ही तुमच्या ड्रीम इलेव्हन संघात ऋद्धिमान साहाला यष्टिरक्षक म्हणून समाविष्ट करू शकता. यानंतर तुम्ही तुमच्या संघात ५ फलंदाजांना स्थान देऊ शकता, ज्यामध्ये गेल्या काही सामन्यांमध्ये उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या ऋतुराज गायकवाड व्यतिरिक्त शुभमन गिल, डेरिल मिशेल, साई सुदर्शन आणि शिवम दुबे यांना स्थान देऊ शकता.
या सामन्यासाठी तुम्ही तुमच्या ड्रीम ११ संघात २ अष्टपैलू खेळाडूंचा समावेश करू शकता. यात तुम्ही रवींद्र जडेजा आणि मोईन अली निवडू शकता.
याशिवाय मुख्य गोलंदाज म्हणून तुम्ही राशिद खान, तुषार देशपांडे आणि शार्दुल ठाकूर यांचा समावेश करू शकता. रशीद आणि शार्दुल तुम्हाला फलंदाजीतही काही गुण मिळवून देऊ शकतात.
या सामन्यासाठी तुम्ही तुमच्या ड्रीम इलेव्हन संघाचा कर्णधार म्हणून ऋतुराज गायकवाडची निवड करू शकता. गायकवाडने आयपीएलच्या या मोसमात आतापर्यंत ६० च्या सरासरीने ११ सामन्यात ५४१ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याच्या बॅटने एक शतकही झळकले आहे. याशिवाय तुम्ही रवींद्र जडेजाला उपकर्णधार म्हणून निवडू शकता जो तुम्हाला गोलंदाजीसह फलंदाजीतही गुण मिळवून देऊ शकेल.
यष्टिरक्षक – वृद्धिमान साहा.
फलंदाज – ऋतुराज गायकवाड (कर्णधार), शिवम दुबे, साई सुदर्शन, शुभमन गिल, डॅरिल मिशेल.
अष्टपैलू - रवींद्र जडेजा, मोईन अली.
गोलंदाज - राशिद खान, तुषार देशपांडे, शार्दुल ठाकूर.
संबंधित बातम्या