GT VS CSK Head to Head : आज गुजरात-सीएसके सामना रंगणार; पीच रिपोर्ट, हेड टू हेड रेकॉर्ड जाणून घ्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  GT VS CSK Head to Head : आज गुजरात-सीएसके सामना रंगणार; पीच रिपोर्ट, हेड टू हेड रेकॉर्ड जाणून घ्या

GT VS CSK Head to Head : आज गुजरात-सीएसके सामना रंगणार; पीच रिपोर्ट, हेड टू हेड रेकॉर्ड जाणून घ्या

May 10, 2024 10:17 AM IST

gt vs csk pitch report : गुजरात आणि सीएसके आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. अशा स्थितीत अहमदाबादची खेळपट्टी कशी असेल, ते जाणून घेऊया.

GT VS CSK Head to Head : आज गुजरात-सीएसके सामना रंगणार; पीच रिपोर्ट, हेड टू हेड रेकॉर्ड जाणून घ्या
GT VS CSK Head to Head : आज गुजरात-सीएसके सामना रंगणार; पीच रिपोर्ट, हेड टू हेड रेकॉर्ड जाणून घ्या

आयपीएल २०२४ च्या ५९ व्या सामन्यात गुजरात टायटन्स (GT) आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आसमने सामने येणार आहेत. गुजरात संघाला त्यांच्या शेवटच्या सामन्यात आरसीबीकडून पराभव स्वीकारावा लागला होता. गुजरात संघ सध्या गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे.

दुसरीकडे, CSK संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. सीएसकेने शेवटचा सामना पंजाब किंग्जविरुद्ध जिंकला होता.

आता अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. अशा स्थितीत अहमदाबादची खेळपट्टी कशी असेल, ते जाणून घेऊया.

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी योग्य मानली जाते. चेंडू बॅटवर खूप चांगला येतो आणि फलंदाजांना फटके मारणे खूप सोपे असते. मात्र, मोठ्या सीमा रेषांमुळे या मैदानावर फिरकीपटू विकेट घेण्यात यशस्वी ठरतात. फिरकीपटूंनाही खेळपट्टीची थोडीफार मदत मिळते.

नरेंद्र मोदी स्टेडियमची आकडेवारी

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये एकूण ३२ आयपीएल सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी १४ सामने जिंकले आहेत, तर नंतर फलंदाजी करणाऱ्या संघांनी १८ विजय मिळवले आहेत. 

नरेंद्र मोदी स्टेडियमवरची सर्वोच्च धावसंख्या २३३ धावा आहे. ही धावसंख्या गुजरातने मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात केली होती.

चालू आयपीएल हंगामात नरेंद्र मोदी स्टेडियमवर एकूण ५ सामने खेळले गेले, ज्यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने एक सामना जिंकला, तर नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाने ४ सामने जिंकले आहेत.

गुजरात वि. सीएसके हेड-टू-हेड रेकॉर्ड

एकूण सामने – ६ सामने

गुजरात टायटन्सन विजय-  ३ 

सीएसके विजय- ३ 

अनिर्णित- ००

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

सीएसके संभाव्य इलेव्हन: अजिंक्य रहाणे, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), डॅरिल मिशेल, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर, रिचर्ड ग्लीसन, तुषार देशपांडे.

गुजरात संभाव्य इलेव्हन: रिद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल (कर्णधार), साई सुधारसन, डेव्हिड मिलर, अजमतुल्ला ओमरझाई, राहुल तेवतिया, शाहरुख खान, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, नूर अहमद, मोहित शर्मा.

Whats_app_banner