आयपीएल २०२४ चा ४३ वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला जात आहे. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर मुंबईने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना ४ बाद २५७ धावांचा डोंगर उभारला आहे. आता मुंबईला सामना जिंकण्यासाठी २५८ धावा करायच्या आहेत.
संघासाठी सलामीवीर जेक फ्रेझर-मॅकगर्कने १५ चेंडूत अर्धशतक केले. मात्र, आयपीएलमधील सर्वात वेगवान शतकाचा विक्रम मोडण्यात मॅकगर्कला अपयश आले. २७ चेंडूत ८४ धावा करून तो बाद झाला. या खेळीत त्याने ६ षटकार आणि ११ चौकार लगावले.
यानंतर ट्रिस्टन स्टब्सने ४८ धावांची नाबाद खेळी केली. अभिषेक पोरेलने ३६ धावांचे योगदान दिले. शाई होप ४१ धावा करून बाद झाला. अक्षर पटेल ११ धावा करून नाबाद राहिला.
तत्पूर्वी, नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात तुफानी झाली. दिल्ली कॅपिटल्सचे सलामीवीर जॅक फ्रेझर मॅकगर्ग आणि अभिषेक पोरेल यांनी ७.३ षटकात ११४ धावा केल्या. यानंतर शाई होप आणि ऋषभ पंत यांच्यात चांगली भागीदारी झाली. ट्रिस्टन स्टब्सने शेवटच्या षटकांमध्ये शानदार खेळ केला.
कर्णधार हार्दिक पंड्या मुंबईसाठी सर्वात महागडा ठरला. त्याने २ षटकात ४१ धावा दिल्या. ल्यूक वुडने ४ षटकात ६८ धावा देत १ बळी घेतला. जसप्रीत बुमराह सर्वात किफायतशीर ठरला. त्याने ४ षटकात ३५ धावा देत १ बळी घेतला. पियुष चावलाने ३६ धावांत १ बळी घेतला.
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा, इशान किशन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, नेहल वढेरा, हार्दिक पंड्या (कर्णधार), टीम डेव्हिड, मोहम्मद नबी, पियुष चावला, ल्यूक वुड, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा.
दिल्ली कॅपिटल्स: जेक फ्रेझर-मॅकगर्क, कुमार कुशाग्रा, शाई होप, ऋषभ पंत (यष्टीरक्षक/कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल, अक्षर पटेल, कुलदीप यादव, लिझाद विल्यम्स, मुकेश कुमार, खलील अहमद.