CSK vs RR Weather Report : सीएसकेच्या मार्गात पावसाचा अडथळा? धोनीच्या संघाला विजय आवश्यक
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  CSK vs RR Weather Report : सीएसकेच्या मार्गात पावसाचा अडथळा? धोनीच्या संघाला विजय आवश्यक

CSK vs RR Weather Report : सीएसकेच्या मार्गात पावसाचा अडथळा? धोनीच्या संघाला विजय आवश्यक

May 12, 2024 10:44 AM IST

CSK vs RR Pitch Report : आज एमए चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्सचे संघ भिडतील. सीएसकेसाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे.

CSK vs RR Weather Report : सीएसेकच्या मार्गात पावसाचा अडथळा? धोनीच्या संघाला विजय आवश्यक
CSK vs RR Weather Report : सीएसेकच्या मार्गात पावसाचा अडथळा? धोनीच्या संघाला विजय आवश्यक

CSK vs RR Weather Report : आयपीएल २०२४ मध्ये रविवारी (१२) दोन सामने रंगणार आहेत. पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स हे संघ आमनेसामने येणार आहेत. यानंतर दिल्ली कॅपिटल्ससमोर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे आव्हान असेल.

ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जला प्लेऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी आजचा सामना जिंकावाच लागणार आहे. त्याचवेळी, राजस्थान रॉयल्स पुन्हा पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर पोहोचण्याचे लक्ष्य ठेवणार आहे. 

पण सामन्याआधी आपण येथे पीच रिपोर्ट आणि वेदर रिपोर्ट जाणून घेणार आहोत.

चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्सचे संघ चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर आमनेसामने येतील. 

चेन्नईचं हवामान कसे असेल?

मात्र या सामन्यात पाऊस खलनायक ठरू शकतो का? वास्तविक, हवामान खात्यानुसार, रविवारी चेन्नईचे तापमान ३६ अंश सेल्सिअसच्या आसपास असेल. याशिवाय आर्द्रता ६९ टक्के राहण्याचा अंदाज आहे. तसेच पावसाची शक्यता ६ टक्के आहे. म्हणजेच या सामन्यात पाऊस खलनायक ठरू शकतो.

सीएसके वि. राजस्थान पीच रिपोर्ट

वास्तविक, आयपीएलच्या या हंगामात चेपॉकच्या खेळपट्टीचा मूड वेळोवेळी बदलत आहे. या मैदानावर अनेक सामन्यांमध्ये खूप धावा झाल्या आहेत, तर खेळपट्टी अनेक सामन्यांमध्ये फिरकीपटूंसाठी उपयुक्त ठरली आहे. त्यामुळे या खेळपट्टीचे स्वरूप समजणे सोपे नाही. या मोसमात पहिल्या डावात सरासरी १८३ धावा झाल्या आहेत. तसेच, धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने ६ सामन्यांत ४ वेळा विजय मिळवला आहे. या खेळपट्टीवर गोलंदाजांना मदत मिळते, पण फलंदाजांनी थोडा वेळ क्रीजवर घालवला तर धावा काढणे सोपे जाते.

सीएसके वि. राजस्थान हेड टू हेड

चेन्नई आणि राजस्थान यांनी आतापर्यंत एकमेकांविरुद्ध २९ आयपीएल सामने खेळले आहेत. सीएसकेने १५ तर आरआरने १४ जिंकले आहेत. सीएसकेची राजस्थानविरुद्धची आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या २४६ धावा आहे. चेन्नईविरुद्ध आरआरचा सर्वोच्च स्कोअर २२३ धावा आहे.

सीएसेक वि. राजस्थान संभाव्य प्लेइंग इलेव्हन

चेन्नई सुपर किंग्स- ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकूर, मथिशा पाथिराना, तुषार देशपांडे आणि सिमरजीत सिंग.

राजस्थान रॉयल्सचे - शस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार आणि यष्टिरक्षक), रायन पराग, शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, शुभम दुबे, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान आणि युझवेंद्र चहल.

 

Whats_app_banner