मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Jasprit Bumrah : सुनील नरेनला हलताही आलं नाही! बुमराहनं टाकला सर्वात खरतरनाक यॉर्कर, पाहा

Jasprit Bumrah : सुनील नरेनला हलताही आलं नाही! बुमराहनं टाकला सर्वात खरतरनाक यॉर्कर, पाहा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
May 11, 2024 11:16 PM IST

Jasprit Bumrah vs Sunil Narine : या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून जसप्रीत बुमराहने नेहमीप्रमाणे शानदार गोलंदाजी केली. बुमराहने तुफान फॉर्मात असलेल्या सुनील नरेनला पहिल्याच चेंडूवर बाद केले. बुमराहने नरेनचा शुन्यावर त्रिफळा उडवला.

सुनील नरेनला हलताही आलं नाही! बुमराहनं टाकला सर्वात खरतरनाक यॉर्कर, पाहा
सुनील नरेनला हलताही आलं नाही! बुमराहनं टाकला सर्वात खरतरनाक यॉर्कर, पाहा

इंडियन प्रीमियर लीग २०२४ चा ६० वा सामना आज (११ मे) कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला जात आहे. ईडन गार्डनवर कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्सला विजयासाठी १५८ धावांचे लक्ष्य दिले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

पावसामुळे सामना २ तास १५ मिनिटे उशिराने सुरू झाला त्यामुळे सामना १६-१६ षटकांचा करण्याचा निर्णय घेण्यात आला. हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर केकेआरने २० षटकांत ७ विकेट गमावत १५७ धावा केल्या.

दरम्यान, या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून जसप्रीत बुमराहने नेहमीप्रमाणे शानदार गोलंदाजी केली.

बुमराहने तुफान फॉर्मात असलेल्या सुनील नरेनला पहिल्याच चेंडूवर बाद केले. बुमराहने नरेनचा शुन्यावर त्रिफळा उडवला.

केकेआरच्या डावातील दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर नरेन बाद झाला. बुमराहचा नरेनला समजलाच नाही. तो फक्त पाहत राहिला आणि बुमराहच्या चेंडूने त्याच्या दांड्या उडवल्या. सुनील नरेनने चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर जात असे समजून तो सोडून दिला होता. पण चेंडू स्टंपवर येऊन आदळला.

केकेआरच्या १५७ धावा

या सामन्यात हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर केकेआरने २० षटकांत ७ विकेट गमावत १५७ धावा केल्या. केकेआरसाठी व्यंकटेश अय्यरने २१ चेंडूंत ६ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ४२ धावा केल्या. मुंबईसाठी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अनुभवी फिरकी गोलंदाज पियुष चावलाने प्रत्येकी २ बळी घेतले.

नरेन ४४व्यांदा शुन्यावर बाद झाला

सुनील नरेन डावाच्या पहिल्याच चेंडूवर बाद झाला. नरेन ४४व्यांदा टी-20 क्रिकेटमध्ये डकवर आला आहे. तसेच तो सर्वाधिकवेळा शुन्यावर बाद होणारा फलंदाज ठरला. सुनील नरेनने इंग्लंडचा माजी सलामीवीर ॲलेक्स हेल्सला मागे टाकले आहे. हेल्स ४३ वेळा शुन्यावर बाद झाला.

नरेन आयपीएलमध्ये १६व्यांदा शुन्यावर बाद झाला आहे. ग्लेन मॅक्सवेल, रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिक यांनी त्याच्यापेक्षा एक वेळा अधिक म्हणजे प्रत्येकी १७ वेळा शुन्यावर विकेट दिली आहे.

जसप्रीत बुमराह जबरदस्त फॉर्मात

जसप्रीत बुमराह आयपीएल २०२४ मध्ये अप्रतिम गोलंदाजी करत आहे. प्लेऑफमध्ये जाण्याच्या मुंबई इंडियन्सच्या आशा संपल्या असल्या तरी बुमराह पर्पल कॅपच्या शर्यतीत आहे. त्याने १३ सामन्यात १९ फलंदाजांना बाद केले आहे. या हंगामात फलंदाजांचे वर्चस्व असताना बुमराहने केवळ ६.४५ च्या इकॉनॉमीने धावा दिल्या आहेत.

IPL_Entry_Point