CSK vs RR Dream 11 Prediction : आज धोनी-संजू सॅमसन भिडणार, ड्रीम इलेव्हनवर अशी बनवा तुमची परफेक्ट टीम
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  CSK vs RR Dream 11 Prediction : आज धोनी-संजू सॅमसन भिडणार, ड्रीम इलेव्हनवर अशी बनवा तुमची परफेक्ट टीम

CSK vs RR Dream 11 Prediction : आज धोनी-संजू सॅमसन भिडणार, ड्रीम इलेव्हनवर अशी बनवा तुमची परफेक्ट टीम

Updated May 12, 2024 11:21 AM IST

csk vs rr dream 11 prediction : आयपीएल २०२४ मध्ये आज चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने येणार आहेत. हा सामना चेन्नईच्या चेपॉक क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे.

CSK vs RR Dream 11 Prediction : आज धोनी-संजू सॅमसन भिडणार, ड्रीम इलेव्हनवर अशी बनवा तुमची परफेक्ट टीम
CSK vs RR Dream 11 Prediction : आज धोनी-संजू सॅमसन भिडणार, ड्रीम इलेव्हनवर अशी बनवा तुमची परफेक्ट टीम

इंडियन प्रीमियर लीग २०२४ चा ६१ वा सामना (१२ मे) चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना सीएसकेचे होम ग्राउंड एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाईल. राजस्थान संघाने या मोसमात प्लेऑफसाठी आपले स्थान जवळपास पक्के केले आहे, पण चेन्नई सुपर किंग्जसाला प्लेऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी उर्वरित दोन्ही साखळी सामने जिंकणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे.

पॉइंट टेबलमध्ये राजस्थानचा संघ १६ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे, तर चेन्नई सुपर किंग्ज संघ १२ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. 

अशा परिस्थितीत राजस्थान असो की सीएसके, दोन्ही संघांकडे तगड्या खेळाडूंची फौज आहे. अशा परिस्थितीत या सामन्यासाठी ड्रीम-इलेव्हन (Dream 11 todays match team prediction) निवडणे निश्चितच खूप कठीण काम असेल, पण येथे आम्ही तुमची काही प्रमाणात मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत.

विकेटकीपर

चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील या सामन्यासाठी तुम्ही तुमच्या ड्रीम इलेव्हन संघात यष्टिरक्षक म्हणून २ खेळाडू निवडू शकता, त्यापैकी एक संजू सॅमसन आणि दुसरा जोस बटलर आहे. हे दोन्ही खेळाडू यंदा अप्रतिम कामगिरी करताना दिसले आहेत, ज्यामध्ये बटलरने बॅटने २ शतकेही केली आहेत.

फलंदाज

तुमच्या ड्रीम इलेव्हनमध्ये प्रमुख फलंदाज म्हणून यशस्वी जैस्वाल, शिवम दुबे, ऋतुराज गायकवाड आणि डॅरिल मिशेल यांचा समावेश करू शकता. गेल्या काही सामन्यांमध्ये जैस्वालला फलंदाजीत चमकदार कामगिरी करता आली नसली तरी या सामन्यात त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा केली जाऊ शकते. 

याशिवाय शिवम दुबेचा फॉर्म या मोसमात आतापर्यंत चांगला दिसत आहे. तर गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात डॅरिल मिशेलची बॅट चांगलीच बोलताना दिसली.

अष्टपैलू

या सामन्यासाठी तुम्ही तुमच्या ड्रीम ११ संघात अष्टपैलू खेळाडू म्हणून रवींद्र जडेजा आणि रियान पराग यांची निवड करू शकता. जडेजाने बॉल आणि बॅट या दोन्ही बाबतीत उत्कृष्ट कामगिरी दाखवली, तर रियान परागची बॅटही या मोसमात जोरदार बोलताना दिसली आहे. 

गोलंदाज

तुम्ही प्रमुख गोलंदाजांमध्ये तुषार देशपांडे, संदीप शर्मा आणि युझवेंद्र चहल यांचा समावेश करू शकता.

बटलर कर्णधार, जडेजा उपकर्णधार 

या सामन्यासाठी, तुम्ही तुमच्या ड्रीम इलेव्हन संघात कर्णधार म्हणून जोस बटलरची निवड करू शकता, ज्याने या हंगामात आतापर्यंत ४२.७५ च्या सरासरीने ३३८ धावा केल्या आहेत, तर उपकर्णधार म्हणून रवींद्र जडेजाची निवड करू शकता. तो बॉल आणि बॅट दोन्हीसह तुम्हाला गुण मिळवून देऊ शकतो.

CSK vs RR Dream 11 Team Prediction

यष्टिरक्षक - जोस बटलर (कर्णधार), संजू सॅमसन.

फलंदाज - यशस्वी जैस्वाल, शिवम दुबे, रुतुराज गायकवाड, डॅरिल मिशेल.

अष्टपैलू - रवींद्र जडेजा (उपकर्णधार), रियान पराग.

गोलंदाज - तुषार देशपांडे, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल.

Whats_app_banner