इंडियन प्रीमियर लीग २०२४ चा ६० वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्सचा १८ धावांनी पराभव केला.
यासह चालू मोसमात प्लेऑफमध्ये पोहोचणारा कोलकाता पहिला संघ ठरला आहे.
१५८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईने एके काळी ५ षटकांत एकही विकेट न गमावता ५९ धावा केल्या होत्या, मात्र त्यानंतर केकेआरच्या फिरकीपटूंनी धावांचा वेग रोखून नियमित अंतराने विकेट्स घेतल्या. पावसाने व्यत्यय आणलेल्या या सामन्यात कोलकाताने प्रथम खेळून १६ षटकांत १५७ धावा केल्या होत्या.
प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सला केवळ १३९ धावा करता आल्या. इशान किशनने २२ चेंडूत ४० धावा केल्या. तर तिलक वर्माने १७ चेंडूत ३२ धावांची खेळी केली. बाकीचे सर्व फलंदाज रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड सुपर फ्लॉप ठरले.
केकेआरकडून हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती आणि आंद्रे रसेलने प्रत्येकी २ बळी घेतले.
आंद्रे रसेलने १५ वे षटक टाकले. या षटकात एकूण १५ धावा आल्या. नमन धीरने रसेलवर २ षटकार आणि १ चौकार लगावला. मुंबईला आता विजयासाठी स६ हा चेंडूत २२ धावा करायच्या आहेत. १५ षटकांत मुंबईची धावसंख्या ६ गड्यांच्या मोबदल्यात १३६ धावा.
कोलकाता नाईट रायडर्सने सामन्यात अप्रतिम पुनरागमन केले आहे. मुंबई इंडियन्सने ११व्या षटकात ८७ धावांवर तिसरी विकेट गमावली आहे. आंद्रे रसेलच्या चेंडूवर षटकार मारण्याच्या प्रयत्नात सूर्यकुमार यादव झेलबाद झाला. यादव १४ चेंडूत ११ धावा करून बाद झाला.
मुंबई इंडियन्सने आठव्या षटकात ६७ धावांवर दुसरा विकेट गमावला आहे. रोहित शर्मा २४ चेंडूत १९ धावा करून बाद झाला. वरुण चक्रवर्तीने रोहितला पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
फिरकीपटू सुनील नरेनने इशान किशनला बाद करून कोलकाताला पहिले यश मिळवून दिले. ईशान २२ चेंडूत ४० धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. आता सूर्यकुमार यादव क्रीजवर आला आहे, तर रोहित शर्मा क्रीजवर आहे.
वैभव अरोराने तिसरे षटक टाकले. या षटकात १४ धावा आल्या. ३ षटकांनंतर मुंबईची धावसंख्या एकही विकेट न गमावता ३१ धावा आहे. रोहित शर्मा १३ चेंडूत १४ आणि इशान किशन ६ चेंडूत ११ धावांवर खेळत आहेत.
कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्सला विजयासाठी १५८ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. पावसामुळे सामना २ तास १५ मिनिटे उशिराने सुरू झाला त्यामुळे सामना १६-१६ षटकांचा करण्याचा निर्णय घेण्यात आला. हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
यानंतर केकेआरने २० षटकांत ७ विकेट गमावत १५७ धावा केल्या. केकेआरसाठी व्यंकटेश अय्यरने २१ चेंडूंत ६ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ४२ धावा केल्या. मुंबईसाठी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अनुभवी फिरकी गोलंदाज पियुष चावलाने प्रत्येकी २ बळी घेतले.
नितीश राणा धावबाद झाल्याने केकेआरला पाचवा धक्का बसला आहे. नितीश २३ चेंडूत ३३ धावा करून बाद झाला. आता रिंकू सिंग क्रीझवर आला असून आंद्रे रसेल त्याच्यासोबत आहे.
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने केकेआरचा सलामीवीर सुनील नरेनला बाद करून संघाला दुसरा धक्का दिला. नरेन शुन्यावर पॅव्हेलियनमध्ये परतला. बुमराहने आपल्या स्पेलच्या पहिल्याच चेंडूवर नरेनला बाद केले.
नुवान तुषाराने पहिल्याच षटकात फिल सॉल्टला बाद करून केकेआरला सुरुवातीचा धक्का दिला. ५ चेंडूत ६ धावा करून सॉल्ट बाद झाला.
कोलकाता नाइट रायडर्स : फिल सॉल्ट (यष्टीरक्षक), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंग, नितीश राणा, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.
इम्पॅक्ट सब: अनुकुल रॉय, वैभव अरोरा, सुयश शर्मा, रहमानउल्ला गुरबाज, अंगक्रिश रघुवंशी.
मुंबई इंडियन्स : इशान किशन (यष्टीरक्षक), नमन धीर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नेहल वढेरा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टीम डेव्हिड, अंशुल कंबोज, पियुष चावला, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा.
इम्पॅक्ट सब: रोहित शर्मा, शम्स मुलानी, शिवालिक शर्मा, मोहम्मद नबी, कुमार कार्तिकेय.
मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी मुंबई प्लेइंग-११ मध्ये कोणताही बदल करणार नसल्याचे हार्दिकने सांगितले. रोहित शर्मा पुन्हा एकदा इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळणार आहे. नितीश राणाचे केकेआर संघात पुनरागमन झाले आहे. त्याला आंगकृष्ण रघुवंशीच्या जागी संघात स्थान देण्यात आले आहे.
कोलकाता येथे खेळला जाणारा केकेआर आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना पावसामुळे प्रत्येकी १६ षटकांचा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सामना रात्री ९.१५ वाजता सुरू होईल, तर नाणेफेक रात्री ९ वाजता होईल.
कोलकात्यात अजूनही पाऊस सुरू आहे. परिस्थिती पाहता सामना रद्द होण्याची शक्यता आहे. तथापि, चांगली गोष्ट म्हणजे संपूर्ण मैदान कव्हर्सने झाकलेले आहे. याशिवाय ईडन गार्डनची ड्रेनेज व्यवस्थाही चांगली आहे. अशा परिस्थितीत पाऊस थांबताच सामना सुरू होऊ शकतो.
कोलकाता आणि मुंबई यांच्यातील सामन्याच्या नाणेफेकीला उशीर होणार आहे. वास्तविक, कोलकातामध्ये पाऊस पडत आहे. तथापि, चांगली गोष्ट म्हणजे संपूर्ण मैदान झाकलेले आहे. येथील ड्रेनेज व्यवस्थाही चांगली आहे. अशा परिस्थितीत पाऊस थांबताच सामना सुरू होऊ शकतो.
दोन वेळा विजेतेपद पटकावणारा कर्णधार गौतम गंभीर संघाचा मार्गदर्शक म्हणून परतल्यानंतर केकेआरने या हंगामात चमकदार कामगिरी केली आहे. आतापर्यंत ११ पैकी ८ सामने जिंकून टॉप टेनमध्ये असलेल्या केकेआरला प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी आणखी एका विजयाची गरज आहे.