मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  LSG vs RR IPL 2024 : राहुलवर संजू भारी! राजस्थानचा लखनौवर ‘रॉयल’ विजय, प्लेऑफमधील स्थान पक्के!

LSG vs RR IPL 2024 : राहुलवर संजू भारी! राजस्थानचा लखनौवर ‘रॉयल’ विजय, प्लेऑफमधील स्थान पक्के!

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Apr 27, 2024 11:50 PM IST

LSG Vs RR IPL 2024 updates : राजस्थान रॉयल्सने जबरदस्त प्रदर्शन करत लखनौ सुपरजायंट्सला एकतर्फी सामन्यात हरवले. त्याचबरोबर राजस्थानने प्लेऑफमधील आपला दावा मजबूत केला आहे.

राजस्थानचा लखनौवर ‘रॉयल’ विजय, प्लेऑफमधील स्थान पक्के!
राजस्थानचा लखनौवर ‘रॉयल’ विजय, प्लेऑफमधील स्थान पक्के!

LSG vs RR Indian Premier League 2024 : इंडियन प्रीमियर लीग २०२४ मध्ये शनिवारी खेळल्या गेलेल्या ४४ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने (Rajasthan royals ) दमदार प्रदर्शन करत आणखी एक विजय मिळवला. लखनौ सुपर जायंट्सने (lucknow super giants ) प्रथम फलंदाजी करताना कर्णधार केएल राहुलच्या ७६ धावांच्या मोबदल्यात ५ बाद १९६ धावांचा डोंगर उभा केला होता. मात्र राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनच्या नाबाद अर्धशतकी खेळीने राजस्थानने आरामात विजय मिळवून प्लेऑफचे तिकीट पक्के केले. 

राजस्थान रॉयल्सने जबरदस्त प्रदर्शन करत लखनौ सुपरजायंट्सला एकतर्फी सामन्यात हरवले. राजस्थानने ९ सामन्यांपैकी ८ सामन्यात विजय मिळवून अंकतालिकेत अव्वलस्थान पटकावले आहे. त्याचबरोबर राजस्थानने प्लेऑफमधील आपला दावा मजबूत केला आहे.

कर्णधार संजू सॅमसन आणि ध्रुव जुरेल यांच्या तडाखेबंद नाबाद अर्धशतकीय खेळीच्या बळावर राजस्थान रॉयल्सने लखनऊ सुपरजायंट्सला ७ विकेट राखून हरवले. लखनौने प्रथम फलंदाजी करताना केएल राहुल आणि दीपक हुड्डा यांच्या अर्धशतकाच्या जोरावर २० षटकात ५ विकेटवर १९६ धावांचा स्कोर उभा केला होता. प्रत्युत्तरादाखल खेळताना राजस्थानने सॅमसन आणि जुरेलच्या खेळीने एक षटक शिल्लक ठेवून १९९ धावा काढून सामना जिंकला. सॅमसन व ध्रुव जुरेल (sanju samson and dhruv jurel) यांच्या चौथ्या विकेटसाठी १११ धावांची विक्रमी भागीदारी झाली. 

त्याआधी यश ठाकुरने स्फोटक फलंदाज जोस बटलरला त्रिफळाचीत करून मोठा काटा दूर केला. बटलरने १८ चेंडूत ३४ धावा काढल्याय त्यानंतर पावरप्ले संपताच राजस्थानला दूसरा झटका बसला. यशस्वी जायसवालही १८ चेंडूत २४ धावा काढून तंबूत परतला. स्पिनर अमित मिश्रा याने इम्पॅक्ट प्लेयर म्हणून मैदानात उतरलेल्या रियान परागला बाद करत राजस्थानला तिसरा झटका दिला. परागने ११ चेंडू खेळून १४ धावा केल्या. 

राजस्थानसमोर १९७ धावांचे आव्हान -

लखनौ सुपरजायंट्सचा कर्णधार केएल राहुल ७६ आणि दीपक हुड्डा च्या ५० धावांच्या बळावर १९७ धावांचे आव्हान राजस्थान रॉयल्ससमोर ठेवले. नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या लखनौने २० षटकात ५ बाद १९६ धावा केल्या होत्या.  राजस्थानकडून संदीप शर्माने २ विकेट घेत लखनौच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले.

IPL_Entry_Point