मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IPL 2023 : यंदाची आयपीएल ठरली ऐतिहासिक! तब्बल १० मोठ्या विक्रमांची नोंद

IPL 2023 : यंदाची आयपीएल ठरली ऐतिहासिक! तब्बल १० मोठ्या विक्रमांची नोंद

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
May 30, 2023 10:01 AM IST

IPL 2023 Historic Records : आयपीएलचा यंदाचा मोसम अनेकार्थांनी ऐतिहासिक ठरला. आजवर कधीही झाले नव्हते, असे विक्रम आयपीएल २०२३ च्या हंगामात नोंदवले गेले.

IPL 2023
IPL 2023 (PTI)

IPL 2023 Historic Records : क्रिकेटच्या थरारक खेळाचा आणखी एक अनुभव रसिकांना देत आयपीएल २०२३ चा रविवारी समारोप झाला. एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघानं पाचव्यांदा ही स्पर्धा जिंकली. अखेरच्या चेंडूपर्यंत श्वास रोखून धरायला लावणाऱ्या या सामन्यानं क्रिकेटप्रेमींना अप्रतिम आनंद दिला. आयपीएलच्या यंदाचा सीझन विक्रमांच्या दृष्टीनं ऐतिहासिक ठरला. यापूर्वी कधीही झाले नव्हते असे १० विक्रम यंदाच्या सीझनमध्ये झाले.

ट्रेंडिंग न्यूज

आयपीएलच्या यंदाच्या सीझनमध्ये धावांचा अक्षरश: डोंगर रचला गेला. बहुतेक सामन्यात संघांनी २०० धावांचा टप्पा ओलांडला. इतरही अनेक विक्रम झाले. या विक्रमांवर टाकूया एक नजर…

असे झाले विक्रम

  • आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच एका सीझनमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम झाला. यंदा ११२४ षटकार मारले गेले. २०२२ मध्ये १०६२ षटकार मारले गेले होते.
  • आयपीएल २०२३ मध्येही चौकारांचा विक्रम झाला. या मोसमात सर्वाधिक २१७४ चौकार मारले गेले, तर २०२२ मध्ये हा विक्रम २०१८ चौकारांचा होता.
  • यंदाच्या सीझनमध्ये आयपीएलमध्ये सर्वाधिक १२ शतकी खेळी करण्यात आल्या. यापूर्वीचा २०२२ मध्ये ८ शतके झळकावली गेली होती.
  • आयपीएलच्या एका मोसमातील सर्वाधिक अर्धशतकं यंदा मारली गेली. तब्बल १५३ वेळा फलंदाजांनी ५० हून अधिक धावा केल्या. यापूर्वीचा हा विक्रम ११८ अर्धशतकांचा होता.

  • यंदाच्या संपूर्ण स्पर्धेत वेगवेगळ्या संघांनी ३७ वेळा २०० हून अधिक धावा केल्या. २०२२ मध्ये केवळ १८ वेळा २०० प्लस धावसंख्या उभारली गेली होती.
  • पहिल्या डावातील सरासरी धावसंख्येचा विक्रमही यंदा मोडीत निघाला. यापूर्वी २०१८ साली १७२ च्या सरासरीनं धावा करण्यात आल्या होत्या, यंदाची सरासरी १८३ राहिली.
  • रनरेटच्या बाबतीतही हा सीझन सरस ठरला. आयपीएल २०२३ मध्ये, फलंदाजांनी प्रति षटक ८.९९ धावा केल्या. २०१८ मधील सर्वोत्तम धावगती ८.६५ प्रति षटक इतकी होती.
  • २०० किंवा त्याहून अधिक धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करण्याचा विक्रमही यंदाच्या मोसमात घडला. तब्बल ८ वेळा संघांनी २०० किंवा त्याहून अधिक धावांचं लक्ष्य गाठलं. २०१४ मध्ये असं तीन वेळा घडलं होतं.
  • एकाच संघातील तीन गोलंदाजांनी आयपीएलच्या एका हंगामात २५-२५ किंवा त्याहून अधिक विकेट घेतल्या. या लीगच्या इतिहासात असं कधीच घडलं नव्हतं. गुजरात टायटन्सच्या मोहम्मद शमी, मोहित शर्मा आणि रशीद खान यांनी ही कामगिरी केली.
  • आयपीएलच्या इतिहासात दोन अनकॅप्ड भारतीय खेळाडूंनी शतकं ठोकण्याची ही पहिलीच वेळ आहे. यशस्वी जयस्वाल आणि प्रभसिमरन सिंग यांनी ही किमया केली.

MS Dhoni : आयपीएल जिंकल्यानंतर निवृत्ती घेणार का?, महेंद्रसिंह धोनी स्पष्टच बोलला!

WhatsApp channel

विभाग