मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IPL : पीयूष चावला ठरला सर्वाधिक षटकार खाणारा पहिला गोलंदाज, आकडा वाचून हैराण व्हाल!

IPL : पीयूष चावला ठरला सर्वाधिक षटकार खाणारा पहिला गोलंदाज, आकडा वाचून हैराण व्हाल!

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
May 27, 2023 10:28 AM IST

Piyush Chawla in GT vs MI IPL 2023 Qualifier 2 : मुंबई इंडियन्सचा फिरकी गोलंदाज पीयूष चावला याच्या नावे एक नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे.

Piyush Chawla
Piyush Chawla

Piyush Chawla in GT vs MI IPL 2023 Qualifier 2 : मुंबई इंडियन्स व गुजरात टायटन्समध्ये शुक्रवारी रंगलेला आयपीएलची दुसरी सेमीफायनल अनेक अर्थांनी संस्मरणीय ठरली. या सामन्यात धावांचा डोंगर उभारला गेलाच, शिवाय अनेक विक्रमही नोंदवले गेले. मुंबईचा अनुभवी फिरकी गोलंदाज पीयूष चावला याच्या नावावर कुणाही गोलंदाजाला नकोसा वाटावा असा एक विक्रम नोंदवला गेला. आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक २०० षटकार खाणारा तो पहिला गोलंदाज ठरला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरातच्या फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजीची पिसे काढली. अवघ्या तीन गड्यांच्या मोबदल्यात २३३ अशी धावसंख्या उभारली. पीयूष चावला प्रचंड महागडा ठरला. त्यानं ३ षटकांत ४५ धावा दिल्या. चावलाच्या गोलंदाजीवर गुजरातच्या फलंदाजांनी पाच षटकार ठोकले. त्याच्या गोलंदाजीवर पडलेल्या षटकारांचा आकडा २०१ वर गेला आहे. आयपीएलमधला हा विक्रम आहे.

Shubman Gill Century : शुभमनच्या शतकाचा 'सारा' जमाना दीवाना, सोशल मीडियावरील या मजेशीर प्रतिक्रिया पाहाच!

आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार खाणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत राजस्थान रॉयल्सचा (RR) फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल दुसऱ्या स्थानी आहे. त्याला १९३ षटकार पडले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा (१९२) आहे. चेन्नईनं या स्पर्धेत अंतिम फेरी गाठली आहे. फायनलमध्ये जडेजाला आणखी षटकार पडल्यास तो या यादीत आणखी वर सरकू शकतो. राजस्थानचा रविचंद्रन अश्विन (१८४) चौथ्या आणि लखनौ सुपर जायंट्स (LSG) चा अमित मिश्रा (१८२) पाचव्या स्थानावर आहे.

असाही योगायोग

पीयूष चावला आणि गुजरातचा सलामीवीर शुभमन गिल यांच्यात क्वालिफायर-२ मध्ये एक विचित्र योगायोग पाहायला मिळाला. चावलाच्या गोलंदाजीवर या सामन्यात मारले गेलेले सर्व ५ षटकार गिलच्या बॅटमधून आले होते. गिलनं ६० चेंडूंचा सामना करून १२९ धावा केल्या. त्यानं ७ चौकार आणि १० षटकार मारले. चालू स्पर्धेतील गिलचं हे तिसरं शतक आहे. आयपीएल २०२३ मध्ये तीन शतकं झळकावणारा तो एकमेव खेळाडू आहे. गिलनं प्लेऑफमधील सर्वात मोठ्या खेळीचा विक्रमही केला. आयपीएल २०१४ च्या प्लेऑफमध्ये १२२ धावा करणाऱ्या वीरेंद्र सेहवागला त्यानं मागं टाकलं.

आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार खाणारे गोलंदाज

२०१ : पियुष चावला

१९३ : युझवेंद्र चहल

१९२ : रवींद्र जडेजा

१८४ : रवीनचंद्र अश्विन

१८२ : अमित मिश्रा

१५५ : ड्वेन ब्राव्हो

१४९ : सुनील नरेन

WhatsApp channel