gt vs csk ipl 2023 final : आयपीएल 2023 चा (IPL 2023 FINAL) अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात होणार आहे. यासाठी चेन्नईचा संघ अहमदाबादला पोहोचला आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील सीएसकेने पहिल्या क्वालिफायरमध्ये गुजरातचा पराभव केला होता. चेन्नईने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक मनोरंजक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये महेंद्रसिंग धोनी आणि दीपक चहर फ्लाइटमध्ये दिसत आहेत. चाहत्यांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे.
वास्तविक, चेन्नई सुपर किंग्सने फ्लाइटमधला एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये दीपक चहर त्याच्या फोनवरून धोनीचा फोटो क्लिक करताना दिसत आहे. तर धोनी कॅमेराकडे बघत हसत आहे. धोनीची ही शैली चाहत्यांना खूप आवडली आहे. या व्हिडिओवर चाहत्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत.
विशेष म्हणजे धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सने या मोसमात चांगली कामगिरी केली आहे. चेन्नईने १४ लीग सामने खेळताना ८ जिंकले आहेत. त्यांना ५ सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले. चेन्नई गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर होता. त्यामुळे सीएसकेने पहिल्या क्वालिफायरमध्ये प्रवेश केला. पहिल्या क्वालिफायरमध्ये त्यांचा सामना अव्वल संघ गुजरात टायटन्सशी झाला. चेन्नईने गुजरातला हरवून आयपीएल फायनलमध्ये धडक मारली.
चेन्नईकडून आयपीएल २०२३ मध्ये डेव्हॉन कॉनवेने सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने १५ सामन्यात ६२५ धावा केल्या आहेत. ऋतुराज गायकवाडने १५ सामन्यात ५६४ धावा केल्या. संघासाठी सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाबद्दल बोलायचे झाले तर तुषार देशपांडेने १५ सामन्यात २१ विकेट घेतल्या आहेत. रवींद्र जडेजाने १५ सामन्यात १९ विकेट घेतल्या आहेत.