IPL 2024 : चेन्नई सुपर किंग्ज प्लेऑफमध्ये कशी पोहोचणार? संपूर्ण गणित येथे समजून घ्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IPL 2024 : चेन्नई सुपर किंग्ज प्लेऑफमध्ये कशी पोहोचणार? संपूर्ण गणित येथे समजून घ्या

IPL 2024 : चेन्नई सुपर किंग्ज प्लेऑफमध्ये कशी पोहोचणार? संपूर्ण गणित येथे समजून घ्या

Updated May 12, 2024 02:33 PM IST

CSK Playoff Qualification Scenarios : चेन्नई सुपर किंग्ज आज राजस्थान रॉयल्सविरुद्ध त्यांच्या ७व्या विजयासाठी मैदानात उतरणार आहे. राजस्थानविरुद्धच्या वजयानंतर चेन्नईचा प्लेऑफमधील मार्ग सुकर होऊ शकतो.

CSK Playoff Qualification Scenarios IPL 2024 : चेन्नई सुपर किंग्ज प्लेऑफमध्ये कशी पोहोचणार? संपूर्ण गणित येथे समजून घ्या
CSK Playoff Qualification Scenarios IPL 2024 : चेन्नई सुपर किंग्ज प्लेऑफमध्ये कशी पोहोचणार? संपूर्ण गणित येथे समजून घ्या (AFP)

IPL 2024 CSK Playoff Qualification Scenarios : आयपीएल २०२४ चा ६१ वा सामना आज (१२) चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार आहे. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जाईल. प्लेऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी सीएसेकाला हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकावा लागणार आहे.

पॉइंट टेबलमध्ये राजस्थानचा संघ १६ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे, तर चेन्नई सुपर किंग्ज संघ १२ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.

CSK साठी थोडे अवघड पणअशक्य नाही

सध्या चेन्नई सुपर किंग्ज १२ सामन्यांत १२ गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. त्यामुळे आता त्यांनी उर्वरित दोन्ही सामने जिंकले तर त्यांचे कमाल गुण १६ होऊ शकतात. तसेच, लखनौ आणि दिल्लीने त्यांचे दोन्ही सामने जिंकले तर त्यांचेही इतकेच गुण होतील. 

पण सीएसकेसाठी चांगली गोष्ट अशी आहे की डीसी आणि एलएसजी आमनेसामने येणार आहेत. त्यामुळे या दोन्ही संघातील एक संघ जास्तीत १४ गुणांपर्यंतच जाऊ शकेल.

तसेच, चेन्नईने आशा केली पाहिजे की या सामन्यातील विजेता संघ त्यांच्या शेवटच्या साखळी सामन्यात पराभूत होईल.

२) यानंतर चेन्नई सुपर किंग्जसाठी आणखी एक शक्यता अशी आहे, की सनरायझर्स हैदराबादने दोन पैकी एक सामना मोठ्या फरकाने हरावा. हैदराबाद गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

३) रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला या शर्यतीतून बाहेर ठेवले जाऊ शकते. कारण आणखी एका पराभवामुळे त्यांच्या प्लेऑफच्या आशा संपुष्टात येतील आणि त्यांचा शेवटचा साखळी सामना चेन्नईविरुद्धच आहे. सनरायझर्स हैदराबादने आपले उर्वरित दोन सामने मोठ्या फरकाने गमावल्यास चेन्नईला त्याचा फायदा होईल. पण चेन्नई सुपर किंग्जने त्यांचे उर्वरित सर्व सामने गमावल्यास त्यांची पात्र होण्याची शक्यता खूपच कमी होईल.

Whats_app_banner

संबंधित बातम्या