आयपीएल २०२४ चा ६० वा लीग सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला जाईल. KKR आणि MI यांच्यातील या मोसमातील हा दुसरा सामना असेल. पहिल्या सामन्यात कोलकाताने मुंबईचा २४ धावांनी पराभव केला होता.
आता मुंबई इंडियन्सला त्या पराभवाचा बदला घ्यायचा आहे. गेल्या सामन्यात सूर्यकुमारने फलंदाजी करत नाबाद शतक झळकावले होते. पॉइंट टेबलमध्ये, कोलकाता नाईट रायडर्सने ११ सामन्यांत ८ विजय नोंदवून प्लेऑफमधील आपले स्थान जवळपास निश्चित केले आहे. त्याचबरोबर मुंबई इंडियन्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.
दरम्यान, मुंबई असो की केकेआर, दोन्ही संघांकडे तगड्या खेळाडूंची फौज आहे. अशा परिस्थितीत या सामन्यासाठी ड्रीम-इलेव्हन (Dream 11 todays match team prediction) निवडणे निश्चितच खूप कठीण काम असेल, पण येथे आम्ही तुमची काही प्रमाणात मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळल्या जाणाऱ्या या सामन्यातील ड्रीम इलेव्हन संघात तुम्ही यष्टीरक्षक म्हणून फिल सॉल्टची निवड करू शकता. इशान किशनलाही ठेवू शकतो. त्याचबरोबर सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, रोहित शर्मा आणि व्यंकटेश अय्यर यांना प्रमुख फलंदाज म्हणून निवडू शकता.
याशिवाय व्यंकटेश अय्यरची बॅट आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध जोरदार बोलताना दिसली आहे. या सामन्यासाठी सुनील नारायणची ड्रीम इलेव्हन संघाचा कर्णधार म्हणून निवड करणे फायद्याचे ठरू शकते, त्याने या हंगामात आतापर्यंत ४६१ धावा केल्या आहेत आणि १४ विकेट्स देखील घेतल्या आहेत.
यष्टिरक्षक- इशान किशन, फिल सॉल्ट
फलंदाज- आंगकृष्ण रघुवंशी, व्यंकटेश अय्यर, सूर्यकुमार (उपकर्णधार), टिळक वर्मा
अष्टपैलू खेळाडू- आंद्रेल रसेल, सुनील नरेन (कर्णधार)
गोलंदाज- वरुण चक्रवर्ती, मिचेल स्टार्क, जसप्रीत बुमराह