Rohit Sharma And KKR Coach Conversation : रोहित शर्मा आयपीएल २०२४ च्या सुरुवातीपासूनच प्रचंड चर्चेत आहे. आयपीएलचा हा मोसम सुरू होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवले होते. रोहितच्या जागी हार्दिक पांड्याकडे मुंबईची कमान सोपवण्यात आली होती.
मात्र, हार्दिकला कर्णधार बनवणे देणे, हे मुंबईसाठी एखाद्या दुःस्वप्नापेक्षा कमी राहिलेले नाही. कारण मुंबई इंडियन्सने अतिशय निराशाजनक कामगिरी केली. मुंबई इंडियन्स हा या मोसमात बाहेर पडणारा पहिला संघ ठरला आहे.
अशातच आता यादरम्यान रोहित शर्मा कोलकाता नाईट रायडर्सचा कोच आणि त्याचा मित्र अभिषेक नायरशी काही महत्वाच्या गोष्टी बोलताना दिसला आहे.
IPL २०२४ चा ६० वा सामना आज (११ मे) मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात ईडन गार्डन्सवर खेळवला जाईल. पण या सामन्यापूर्वी मुंबईचा माजी कर्णधार रोहित शर्मा आणि केकेआरचे सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर बोलताना दिसले. त्यांच्या संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
या व्हायरल व्हिडिओमुळे रोहित शर्मा मुंबई इंडियन्सपासून वेगळा होणार, अशा चर्चांना उधाण आले आहे. तर व्हिडीओमध्ये रोहित आणि केकेआरचे प्रशिक्षक यांच्यात काय बोलणे झाले ते येथे जाणून घेऊया.
मात्र, या संभाषणात रोहित शर्माने मुंबई इंडियन्स किंवा इतर कोणत्याही आयपीएल संघाचे नाव घेतले नाही.
व्हिडिओच्या सुरुवातीला रोहित शर्मा म्हणाला, "प्रत्येक गोष्ट बदलत आहे. हे त्यांच्यावर अवलंबून आहे, मी त्याकडे लक्ष देत नाही." व्हिडिओमध्ये आवाज स्पष्ट येत नाही. त्यामुळे नेमका विषय काय कळत नाहीत.
त्यानंतर रोहित शर्मा पुढे म्हणाला, "ते काहीही असो ते माझे घर आहे, ते मंदिर आहे जे मी बांधले आहे." याशिवाय अनेक चाहते असा दावा करत आहेत की, व्हिडिओच्या शेवटी रोहित शर्माने ‘मेरा क्या मेरा तो लास्ट है’ असे म्हटले आहे. मात्र, आवाज स्पष्ट आलेला नाही.
या मोसमात कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील हा दुसरा सामना आहे. याआधी दोघांमधील पहिल्या लढतीत कोलकाताने मुंबईचा २४ धावांनी पराभव केला होता.