Qualifier 1 weather Report : अहमदाबादेत आज पावसाची शक्यता किती? सामना झाला नाही तर नियम काय? जाणून घ्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Qualifier 1 weather Report : अहमदाबादेत आज पावसाची शक्यता किती? सामना झाला नाही तर नियम काय? जाणून घ्या

Qualifier 1 weather Report : अहमदाबादेत आज पावसाची शक्यता किती? सामना झाला नाही तर नियम काय? जाणून घ्या

May 21, 2024 10:41 AM IST

IPL 2024 Qualifier 1 weather update : दोन्ही संघांसाठी हा सामना खूप महत्त्वाचा असणार आहे. हा सामना जिंकणारा संघ अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित करेल. तसेच, या सामन्याच्या दिवशी अहमदाबादमध्ये पावसाची शक्यता कमी आहे.

Qualifier 1 weather Report : अहमदाबादेत आज पावसाची किती शक्यता? सामना झाला नाही तर नियम काय? जाणून घ्या
Qualifier 1 weather Report : अहमदाबादेत आज पावसाची किती शक्यता? सामना झाला नाही तर नियम काय? जाणून घ्या

आयपीएल २०२४ मधील प्लेऑफ सामने आजपासून (२१ मे) सुरू होणार आहेत. प्लेऑफमध्ये प्रथम क्वालिफायर-१ सामना खेळला जाईल. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ आमनेसामने असतील. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार आहे. 

या मोसमात एकूण ३ सामने पावसामुळे वाहून गेले आहेत, त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळल्या जाणाऱ्या या महत्त्वाच्या सामन्यात हवामान कसे असेल ते जाणून घेऊया.

क्वालिफायर वन सामन्यात हवामान कसे असेल?

दोन्ही संघांसाठी हा सामना खूप महत्त्वाचा असणार आहे. हा सामना जिंकणारा संघ अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित करेल. तसेच, या सामन्याच्या दिवशी अहमदाबादमध्ये पावसाची शक्यता कमी आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अहमदाबादचे हवामान आल्हाददायक आणि ऊन असेल. अहमदाबादमधील सामन्यादरम्यान तापमान ३८-४२ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत चाहत्यांना २१ मे रोजी होणाऱ्या सामन्याचा आनंद लुटण्याची संधी मिळणार आहे.

पाऊस पडल्यास नियम काय?

प्लेऑफ सामन्यांदरम्यान पाऊस पडल्यास, किमान ५-५ षटकांचा सामना खेळण्याचा प्रयत्न केला जाईल किंवा सुपर ओव्हरद्वारे निकाल लावण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र सामन्यात एकही चेंडू पडला नाही तर गुणतालिकेतील संघांच्या स्थानानुसार निर्णय घेतला जाईल. 

कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणारा सामना रद्द झाला तर त्याचा फायदा कोलकाता नाईट रायडर्सला होईल. वास्तविक, कोलकाता नाईट रायडर्स लीग टप्प्यात अव्वल स्थानावर आहे. अशा स्थितीत क्वालिफायर-१ सामना रद्द झाल्यास केकेआरला थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळेल.

यंदा तीन सामने पाण्यात

पावसामुळे या मोसमात आतापर्यंत ३ सामने रद्द झाले आहेत. ३ मे रोजी गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. त्यानंतर १६ मे रोजी सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामनाही पावसामुळे वाहून गेला होता. साखळी फेरीतील शेवटचा राजस्थान-केकेआर सामनाही पावसामुळे होऊ शकला नाही.

दोन्ही स्क्वॉड

सनरायझर्स हैदराबादः ट्रॅव्हिस हेड, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, सनवीर सिंग, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, विजयकांत व्यासकांत, टी नटराजन, अभिषेक शर्मा, उमरान मलिक, मयंक अग्रवाल , ग्लेन फिलिप्स, वॉशिंग्टन सुंदर, मार्को जॉन्सन, मयंक मार्कंडे, एडन मार्कराम, राहुल त्रिपाठी, अनमोलप्रीत सिंग, उपेंद्र यादव, झटवेध सुब्रमण्यम, फजलहक फारुकी, आकाश महाराज सिंग.

कोलकाता नाइट रायडर्स : रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंग, नितीश राणा, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, वैभव अरोरा, अनुकुल रॉय, सुयश शर्मा, अंगकृष्ण रघुवंशी, मनीष पांडे, दुष्मंथा चमीरा, श्रीकर भारत, चेतन सकरिया, शेरफान रदरफोर्ड, साकिब हुसेन, अल्लाह गझनफर.

Whats_app_banner

संबंधित बातम्या