कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल २०२४ च्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी आज (२१ मे) पहिल्या क्वालिफायर सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा ८ गडी राखून पराभव केला आहे.
या क्वालिफायर-वन सामन्यात हैदराबाद संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना १६० धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात केकेआरने १३.४ षटकांत २ गडी गमावून सामना जिंकला. तसेच फायनलमध्ये प्रवेश केला.
केकेआरने १६० धावांचा पाठलाग करताना छोट्या भागीदारी केल्या आणि शेवटी, व्यंकटेश अय्यर आणि श्रेयस अय्यर यांच्या ९७ धावांच्या भागीदारीच्या जोरावर त्यांनी क्वालिफायर सामना जिंकला आणि आयपीएल २०२४ च्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
१६० धावांचा पाठलाग करताना गुरबाज आणि सुनील नरेन यांच्यातील ४४ धावांच्या सलामीच्या भागीदारीने कोलकाताला चांगली सुरुवात करून दिली आणि उर्वरित काम व्यंकटेश अय्यर आणि श्रेयस अय्यरच्या खेळीने केले.
१६० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सुनील नरेन आणि रहमानउल्ला गुरबाज यांनी केकेआरला दमदार सुरुवात करून दिली. दरम्यान, चौथ्या षटकात गुरबाज १४ चेंडूत २३ धावा काढून बाद झाला. या दमदार सुरुवातीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने पॉवरप्ले ओव्हर्समध्ये १ गडी गमावून ६३ धावा केल्या होत्या.
पॉवरप्ले संपल्यानंतरही केकेआरचा रनरेट कमी झाला नाही. १० षटकांच्या अखेरीस कोलकाताने २ गडी गमावून १०७ धावा केल्या होत्या आणि संघाला विजयासाठी ६० चेंडूत ५३ धावा करायच्या होत्या.
दरम्यान, व्यंकटेश अय्यरने २८ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले, तर कर्णधार श्रेयस अय्यरने २३ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. व्यंकटेश अय्यर आणि श्रेयस यांच्यातील ९७ धावांच्या नाबाद भागीदारीमुळे कोलकाता नाईट रायडर्सचा ८ गडी राखून विजय निश्चित झाला.
तत्पूर्वी, वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) सनरायझर्स हैदराबादला १९.३ षटकांत १५९ धावांत गुंडाळले.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या हैदराबाद संघाची सुरुवात खूपच खराब झाली. संघाने केवळ ३९ धावांत ४ विकेट गमावल्या होत्या. यानंतर राहुल त्रिपाठीने ३५ चेंडूत ५५ धावा आणि हेनरिक क्लासेनने २१ चेंडूत ३२ धावा केल्या.
हैदराबादचे १२६ धावांत ९ विकेट पडल्या होत्या, त्यानंतर पॅट कमिन्सने शेवटी २४ चेंडूत ३० धावा करत धावसंख्या १५० च्या पुढे नेली.
त्याआधी त्रिपाठी आणि क्लासेन यांनी पाचव्या विकेटसाठी ३७ चेंडूत ६२ धावांची भागीदारी केली. अखेरीस पॅट कमिन्सने ३० धावा केल्या. याशिवाय एकाही फलंदाजाला २० चा आकडा गाठता आला नाही. तर KKR संघासाठी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने सर्वाधिक ३ बळी घेतले. वरुण चक्रवर्तीने २ बळी घेतले. वैभव अरोरा, सुनील नरेन, आंद्रे रसेल आणि हर्षित राणा यांना प्रत्येकी १ विकेट मिळाला.
संबंधित बातम्या