लक्ष्मीकांत बेर्डे, विजय चव्हाण, रमेश भाटकरांच्या आठवणीत मिलिंद गवळी भावूक, केली सोशल मीडियावर पोस्ट
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  लक्ष्मीकांत बेर्डे, विजय चव्हाण, रमेश भाटकरांच्या आठवणीत मिलिंद गवळी भावूक, केली सोशल मीडियावर पोस्ट

लक्ष्मीकांत बेर्डे, विजय चव्हाण, रमेश भाटकरांच्या आठवणीत मिलिंद गवळी भावूक, केली सोशल मीडियावर पोस्ट

Aarti Vilas Borade HT Marathi
Apr 17, 2024 02:17 PM IST

आई कुठे काय करते मालिकेतील अभिनेते मिलिंद गवळी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे, विजय चव्हाण, रमेश भाटकरांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

मिलिंद गवळी लक्ष्मीकांत बेर्डे, विजय चव्हाण, रमेश भाटकरांच्या आठवणीत भावूक, केली सोशल मीडियावर पोस्ट
मिलिंद गवळी लक्ष्मीकांत बेर्डे, विजय चव्हाण, रमेश भाटकरांच्या आठवणीत भावूक, केली सोशल मीडियावर पोस्ट

एकेकाळी टीव्ही विश्वावर अधिराज्य गाजवणारी मालिका म्हणजे ‘आई कुठे काय करते.’ सध्या ही मालिका टीआरपी यादीमधून बाहेर पडली असली तरी मालिकेतील कलाकार हे कायमच चर्चेत असतात. या मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारणारा कलाकार मिलिंद गवळी हा कायमच चर्चेत असतो. तो सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असतो. त्याच्या आयुष्यात घडत असलेल्या गोष्टी तो सतत नेटकऱ्यांसोबत शेअर करताना दिसतो. नुकताच त्याने केलेली पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

मिलिंद गवळीने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘मराठा बटालियन’ या चित्रपटाच्या सीनमधील व्हिडीओ शेअर केला आहे. या हा व्हिडीओ शेअर करत त्याने लक्ष्मीकांत बेर्डे, विजय चव्हाण आणि रमेश भाटकर यांच्या आठवणींना उजाळा देताना दिसत आहे. त्यांच्या आठवणीत मिलिंद भावूक झाल्याचे दिसत आहे. तसेच हा चित्रपट त्यांच्या करिअरमधील पहिला चित्रपट असल्याचे सांगितले आहे.
वाचा: अरुण गोविल आणि दीपिका चिखलीया रुपेरी पडद्यावर, राम-सीतेची लोकप्रिय जोडी 'या' मराठी सिनेमात करणार काम

काय आहे मिलिंद गवळीची पोस्ट?

"लक्ष्मीकांत बेर्डे, विजय चव्हाण, रमेश भाटकर. मराठी चित्रपट व नाट्य सृष्टीतले दिग्गज असे कलाकार, ज्यांच्याबरोबर मला काम करायला मिळालं, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबरोबर “मराठा बटालियन” मध्ये त्यांच्याबरोबर काम करायची संधी मिळाली, या सिनेमांमध्ये मला अमर भोसले च्या भूमिकेसाठी घेण्यात आलं, हा व्हिडीओ जो मी अपलोड केला आहे तो माझा या चित्रपटातला पहिलाच सीन होता. मराठीतल्या सुपरस्टारला हाताला धरून त्याच्यावर ओरडायचे होते. पहिलाच दिवस पहिला सीन. नाशिकच्या कुठल्यातरी डोंगरात शूटिंग होते. दडपण आले होते. कदाचित लक्ष्मीकांत बेर्डे यांना त्याची जाणीव झाली असावी आणि त्यांनी 'आपण रिहर्सल करूया' असे मला सांगून कम्फर्टेबल केले. हा सीन झाल्यानंतर सुद्धा त्यांनी माझ्या कामाचे कौतुक केले होते. अख्या शुटिंग भर हसत खेळत मजा मस्ती करत हा "मराठा बटालियन" त्यांनी पूर्ण केला. विजू मामांची आणि त्यांची खूप वर्षांपासूनची घट्ट मैत्री होतीच त्यामुळे ते दोघे मिळून असंख्य लोकांना पिडायचे, सतत हस्त खेळत वातावरण ठेवायचे" असे मिलिंदने पोस्टमध्ये म्हटले आहे.

पुढे तो म्हणाला, "विजू मामांबरोबर मी जवळजवळ आठ एक सिनेमे केले. मराठी इंडस्ट्री मधले ते सगळ्यात बिझी स्टार होते. ऐकावेळेला त्यांचे सहा सात सिनेमे चालूच असायचे असा हा एकमेव स्टार होता ज्याच्या डबिंगसाठी, ‘ते' जिथे शुटिंग करत असतील तिथे अरेंजमेंट, तिथे डबिंग स्टुडिओ बुक केला जायचा. बरं त्यांनी कधीही मोबाईलचा वापर केला नाही. त्यांच्याकडे मोबाईलच नव्हता. फारच सुपर टॅलेंटेड असा कलाकार विजू मामा होतेय “तू तू मी मी" या एका नाटकात त्यांनी चौदा भूमिका केल्या होत्या. रमेश भाटकर तर स्टायलिस्ट स्टार होते आणि फार भारी कलाकार पण होते ते. या तिघांनीही माझ्यावर खूप प्रेम केलं. मला खूप प्रोत्साहन दिलं, कौतुक केलं, हे तिघेही दिग्गजच होते, पण कधीही त्यांनी, गर्व केला नाही. उलट आमच्यासारख्या नवोदित कलाकाराला खूप सांभाळून घेऊन कामे केली. सिनेमांचे जुने सीन्स बघत असताना सतत असं वाटतं की ते आपल्यामध्ये आहेत ते आपल्याला सोडून गेलेच नाहीयेत. त्यांच्याबरोबर काम करणे मी सतत मिस करत असतो. प्रेक्षकांच्या मनामध्ये तर त्यांनी त्यांची जागा निर्माण केलीच आहे.
वाचा: ‘गॅलेक्सी’ अपार्टमेंटमधील 1BHK फ्लॅट सोडण्यास सलमान खान तयार का नाही? काय आहे कारण

पण माझ्या मनामध्ये सुद्धा त्यांची खूप मोठी जागा आहे! ते आता जिथे कुठे असतील तिथे सुद्धा ते एकमेकांची खेचत असतील मस्करी करत असतील. आजूबाजूंच्यांचे पोट दुखेपर्यंत त्यांना हसवत असतील, आनंद पसरवत असतील."
वाचा: 'या' उत्तराने लारा दत्ता हिने जिंकला ‘मिस युनिव्हर्स’चा ताज; परीक्षकही झाले होते थक्क

कलाकारांनी केल्या कमेंट

मिलिंद गवळी यांच्या या पोस्टवर लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे याने कमेंट केली आहे. तसेच इतर कलाकारांनी देखील कमेंट केल्या आहेत. “तुमचे किती छान अनुभव आहेत. तुम्ही खूप नशीबवान आहात. असंच छान काम करत राहा” अशी कमेंट एका यूजरने केली आहे. तर दुसऱ्या एका यूजरने “जुन्या चित्रपटाबद्दल तुम्ही लिहिलेल्या आठवणी खूपच छान असतात… खूप छान लिखाण आहे तुमचं…वाचतच राहावस वाटतं…” असे म्हटले आहे.

Whats_app_banner