रविवारी पहाटे ४ वाजून ५५ मिनिटांच्या सुमारास बॉलिवूडचा भाईजान सलमान खान वास्तव्यास अललेल्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटवर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारातील एक गोळी ही गॅलरीमधून सलमानच्या घरात गेली. तर दुसरी गोळी घराच्या भींतीवर लागली. या हल्ल्याची जबाबदारी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईने घेतली आहे. या प्रकरणावर सलमानने अद्याप प्रक्रिया दिली नव्हती. आता त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मौन सोडले आहे.
सलमाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने त्याच्या जिममधील साहित्याच्या ब्रँडची माहिती दिली आहे. त्याने घरावर झालेल्या हल्ल्याविषयी कोणतीच माहिती किंवा प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे चाहते केवळ चिंता व्यक्त करत आहे. अनेकांनी सलमानच्या या व्हिडीओवर कमेंट केल्या आहेत. काहींनी सलमान खानला काळजी घेण्यास सांगितली आहे. तर काहींनी कमेंटमध्ये लॉरेन्स बिश्नोईचा उल्लेख केला आहे.
वाचा: 'या' उत्तराने लारा दत्ता हिने जिंकला ‘मिस युनिव्हर्स’चा ताज; परीक्षकही झाले होते थक्क
नेटकऱ्यांना सलमान खानची काळजी सतावत आहे. ‘आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो’, ‘सलमान खानची घटनेबद्दल अपडेट देण्याची पद्धत कॅज्युअल आहे’, ‘काळजी घे’, ‘लॉरेन्स बिश्नोई सलमान खानचे काहीच बिघडवू शकत नाही’, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स या व्हिडीओवर करण्यात आल्या आहेत. फक्त चाहतेच नाही तर बॉलीवूड सेलिब्रिटींनीही या व्हिडीओवर कमेंट्स केल्या आहेत.
वाचा: ‘गॅलेक्सी’ अपार्टमेंटमधील 1BHK फ्लॅट सोडण्यास सलमान खान तयार का नाही? काय आहे कारण
रविवारी पहाटेच्या वेळी सलमान खानच्या गॅलक्सी अपार्टमेंट बाहेर झालेल्या गोळीबाराचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले. या सीसीटीव्ही फूटेजमध्ये गोळीबार करणाऱ्या आरोपीने काळ्या रंगाचे जॅकेट आणि टोपी घातल्याचे दिसत होते. पहाटे अचानक दोन व्यक्ती दुचाकीवरून सलमानच्या घराखाली येतात, फायरिंग करतात आणि तेथून पळ काढतात. त्यानंतर आता दोन व्यक्तींची ओळख पटली असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
वाचा: अरुण गोविल आणि दीपिका चिखलीया रुपेरी पडद्यावर, राम-सीतेची लोकप्रिय जोडी 'या' मराठी सिनेमात करणार काम
गोळीबार झाला त्यावेळी सलमान खान कुठे होता? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. यावर पोलिसांकडून माहिती देण्यात आली. ज्यावेळी गोळीबार झाला त्यावेळी सलमान खान हा घरातच झोपलेला होता. तो आपल्या संपूर्ण कुटुंबियांसोबत होता अशी माहिती समोर आली आहे.