अर्धशतक झळकावून स्टॉइनिस पॅव्हेलियनमध्ये परतला.
मोहम्मद नबीने लखनौला चौथा धक्का दिला. त्याने मार्कस स्टॉइनिसला झेलबाद केले. या सामन्यात त्याने ३९ चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याने ६२ धावा करून बाद झाला. सध्या निकोलस पूरन आणि ॲश्टन टर्नर क्रीजवर आहेत.
LSG vs MI: मुंबईची सुरुवातीलाच पकड घट्ट
मुंबईच्या गोलंदाजांनी सुरुवातीलाच चांगली गोलंदाजी केली आहे. लखनौने तीन षटकात ११ धावा केल्या आहेत. राहुल धावांसाठी झगडत आहे. त्याने १३ चेंडूत ५ धावा केल्या आहेत. स्टॉइनिस ४ चेंडूत ५ धावा करून क्रीजवर आहे.
मुंबई इंडियन्सने ५० धावांचा पल्ला गाठला
मुंबई इंडियन्सने डगमगत १० षटकात ५० धावांचा टप्पा पार केला. इशान २१ धावा आणि वढेरा ९ धावांवर खेळत आहे. दोघांमधील ३० धावांची भागीदारी पूर्ण झाली.
Mumbai Indians: मुंबई इंडियन्सच्या डावाला सुरुवात
मुंबईचा डाव सुरू झाला आहे. इशान किशन आणि रोहित शर्मा फलंदाजीसाठी मैदानात उतरले आहेत. अष्टपैलू मार्कस स्टोइसने लखनौसाठी पहिले षटक टाकले आणि दोन धावा दिल्या.
LSG vs MI Live Score: लखनौचा टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय
लखनौने मुंबईविरुद्ध नाणेफेक जिंकून लखनौचा कर्णधार केएल राहुलने लक्ष्याचा पाठलाग करण्याचा निर्णय घेतला.
मुंबई इंडियन्ससाठी महत्त्वाचा सामना
मुंबई इंडियन्ससाठी आजचा सामना करो या मरोचा असेल. लखनौविरुद्ध सामन्यातील पराभव मुंबई आणि प्लेऑफमधील अंतर आणखी वाढवू शकतो.
LSG Squads: लखनौ सुपर जायंट्सचा संघ
क्विंटन डी कॉक, केएल राहुल (विकेटकिपर, कर्णधार), मार्कस स्टोइनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, आयुष बडोनी, कृणाल पंड्या, मॅट हेन्री, रवी बिश्नोई, मोहसीन खान, यश ठाकूर, अमित मिश्रा, अर्शीन कुलकर्णी, कृष्णप्पा गौथम, मणिमरन सिद्धार्थ, युधवीर सिंग चरक, मयंक यादव, काइल मेयर्स, ॲश्टन टर्नर, प्रेरक मंकड, नवीन-उल-हक, देवदत्त पडिक्कल, अर्शद खान, शामर जोसेफ.
Mumbai Indians Squads: मुंबई इंडियन्सचा संघ
हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, इशान किशन (यष्टीरक्षक), रोमॅरियो शेफर्ड, शम्स मुलानी, गेराल्ड कोएत्झी, पियुष चावला, जसप्रीत बुमराह, क्वेना माफाका, मोहम्मद नबी, सूर्यकुमार यादव, श्रेयस गोपाल, नुवान ब्रेवाड, लुकाउड, लुकाऊ , विष्णू विनोद, अर्जुन तेंडुलकर, नेहल वढेरा, कुमार कार्तिकेय, शिवालिक शर्मा, अंशुल कंबोज, आकाश मधवाल, नमन धीर, टिळक वर्मा, टिम डेव्हिड.