IPL 2024: आयपीएल २०२४ मधील ५० व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेत दोन्ही संघानी दमदार कामगिरी केली आहे. आयपीएल २०२४ च्या गुणतालिकेत राजस्थान रायल्सचा संघ १६ गुणांसह अव्वल स्थानी पोहोचला आहे. तर, नऊ पैकी पाच सामने जिंकलेला हैदराबादचा संघ १० गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. हैदराबादचा संघ राजस्थानविरुद्ध सामना जिंकल्यास गुणतालिकेच्या टॉप-४ मध्ये प्रवेश करेल. दरम्यान, दोन्ही संघामधील झालेल्या सामन्यातील आकडेवारीवर नजर टाकुयात.
आयपीएलच्या इतिहासात सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आतापर्यंत १८ सामने झाले आहेत. यापैकी नऊ सामने राजस्थानने तर नऊ सामने हैदराबादने जिंकले आहेत. यावरून हे समजू शकते की, यापैकी कोणीही कमी नाही. दोन्ही संघांनी प्रत्येकी एक वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहेत. राजस्थानने २००८ मध्ये आयपीएल जिंकले होते. तर, हैदराबादने २०१६ मध्ये विजेतेपद पटकावले. गेल्या पाच सामन्यांबद्दल बोलायचे झाले तर राजस्थानने तीन आणि हैदराबादने दोन जिंकले आहेत.
हैदराबादच्या खेळपट्टीवर फलंदाजांचे वर्चस्व आहे. येथील खेळपट्टी पूर्णपणे सपाट आहे. या खेळपट्टीवर अनेकदा २०० पेक्षा जास्त धावा झाल्या. दोन्ही डाव एकत्र केले तर 500 धावांचा टप्पाही पार केला आहे.गोलंदाजीत फिरकीपटू नक्कीच काही प्रभाव दाखवू शकतात. बाकी वेगवान गोलंदाजांसाठी इथे फार मदत मिळत नाही. हैदराबादची ताकद ही त्याची फलंदाजी आहे हे मागील सामन्यांमधूनही दिसून आले आणि खेळपट्टीही तशीच आहे.
हैदराबादचा संभाव्य संघ: अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), नितीश रेड्डी, अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी नटराजन.
इम्पॅक्ट प्लेअर: अनमोलप्रीत सिंग/मयांक मार्कंडे
राजस्थानचा संभाव्य संघ: यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार आणि विकेटकीपर), रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल.
इम्पॅक्ट प्लेअर: रोव्हमन पॉवेल
संबंधित बातम्या