इंडियन प्रीमियर लीग २०२४ चा ४९ वा सामना आज (१ मे) चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स यांच्यात खेळला गेला. चेन्नईच्या चेपॉक स्टेडिमवर पुन्हा एकदा पंजाब किंग्सने चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला आहे. यावेळी पंजाब किंग्जने चेन्नई सुपर किंग्जचा ७ गडी राखून पराभव केला.
फिरकीपटूंना अनुकूल अशा खेळपट्टीवर प्रथम खेळून चेन्नई सुपर किंग्जने २० षटकांत ७ गडी गमावून १६२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पंजाब किंग्जने १८व्या षटकातच ३ गडी गमावून लक्ष्य गाठले.
पंजाबकडून जॉनी बेअरस्टोने ३० चेंडूत ४६ आणि रिली रॉसोने २३ चेंडूत ४३ धावा केल्या. तर शशांक सिंग २५ धावांवर नाबाद तर सॅम करन २६ धावांवर नाबाद माघारी परतला. पंजाबचा या मोसमातील हा चौथा विजय आहे. चेन्नईचा हा पाचवा पराभव आहे.
शार्दुल ठाकूरने रिली रॉसौला बोल्ड करत पंजाबला तिसरा धक्का दिला. बेअरस्टोप्रमाणेच रॉसौचेही अर्धशतक हुकले आणि तो २३ चेंडूत ४३ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. कर्णधार सॅम करन क्रीझवर आला आहे.
शिवम दुबेने जॉनी बेअरस्टोला बाद करून पंजाब किंग्जला दुसरा धक्का दिला. बेअरस्टो ३० चेंडूत ४६ धावा करून बाद झाला. आता शशांक सिंग क्रीझवर आला असून त्याच्यासोबत रिले रॉसौ आहे.
वेगवान गोलंदाज रिचर्ड ग्लीसनने पहिला सामना खेळत प्रभसिमरन सिंगला बाद करून पंजाबला पहिला धक्का दिला. प्रभासिमरन १० चेंडूत १३ धावा करून बाद झाला. आता रिली रोसोउ क्रीझवर आला आहे.
चेन्नईने दिलेल्या १६३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी पंजाबचे फलंदाज मैदानात उतरले आहेत. प्रभासिमरनसह जॉनी बेअरस्टो क्रीजवर आहे.
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या चेन्नई सुपर किंग्जला २० षटकांत ६ गडी बाद १६२ धावाच करता आल्या. पॉवरप्लेमध्ये झंझावाती सुरुवात करणाऱ्या चेन्नईला ८ ते १५ षटकांमध्ये एकही चौकार मारता आला नाही. ६ षटकांत संघाची धावसंख्या एकही विकेट न पडता ५५ धावा होती, मात्र १६ षटकांत स्कोअर ११० च्या आसपास होता.
चेन्नईकडून कर्णधार ऋतुराज गायकवाडने ४८ चेंडूत ६२ धावांची खेळी केली. त्याच्या बॅटमधून ५ चौकार आणि २ षटकार आले. शेवटी महेंद्रसिंह धोनीने ११ चेंडूत १ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने १४ धावा केल्या. या मोसमात तो पहिल्यांदाच बाहेर बाद झाला आहे. तो २० व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर धावबादझा ला.
वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने कर्णधार ऋतुराज गायकवाडला बाद करून चेन्नईला पाचवा धक्का दिला. ऋतुराज ४८ चेंडूत ६२ धावा करून बाद झाला. आता माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी क्रिजवर आला असून त्याच्यासोबत मोईन अली आहे.
चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने पंजाबविरुद्ध अर्धशतक झळकावले. यासह गायकवाड ऑरेंज कॅपच्या शर्यतीत विराट कोहलीच्या पुढे गेला आहे.
चांगली सुरुवात केल्यानंतर सीएसकेचा डाव अडखळला आहे. चेन्नईने अवघ्या ६ धावांत ३ विकेट गमावल्या आहेत. शिवम दुबे शुन्यावर बाद झाला. यानंतर राहुल चहरच्या चेंडूवर रवींद्र जडेजा बाद झाला. जडेजा ४ चेंडूत २ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. चेन्नईने आता समीर रिझवीला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून मैदानात उतरवले आहे. त्याच्यासोबत कर्णधार ऋतुराज गायकवाड क्रीझवर आहे.
हरप्रीत ब्रारने सलामीवीर अजिंक्य रहाणेला बाद करत चेन्नईला पहिला धक्का दिला. रहाणेने ऋतुराज गायकवाडसोबत पहिल्या विकेटसाठी ६४ धावांची भागीदारी केली, मात्र ब्रारने ही भागीदारी मोडीत काढली. आता शिवम दुबे क्रीझवर आला असून त्याच्यासोबत कर्णधार ऋतुराज गायकवाड आहे.
चेन्नई सुपर किंग्जचा डाव सुरू झाला आहे. चेन्नईकडून अजिंक्य रहाणेसह कर्णधार रुतुराज गायकवाड डावाची सलामीसाठी
आली आहेत, तर पंजाबसाठी वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने गोलंदाजीला सुरुवात केली आहे.
पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): जॉनी बेअरस्टो, सॅम करन (कर्णधार), रिली रोसो, शशांक सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग.
चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): अजिंक्य रहाणे, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), डॅरिल मिशेल, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, दीपक चहर, रिचर्ड ग्लीसन, मुस्तफिजुर रहमान.
पंजाब किंग्जचा कर्णधार सॅम करनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी पंजाबने आपल्या प्लेइंग-११ मध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. चेन्नईसाठी मागील सामन्यात चार विकेट घेणारा मथिशा पाथिराना आणि वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे या सामन्यासाठी उपलब्ध असणार नाहीत.
या दोन गोलंदाजांच्या जागी शार्दुल ठाकूर आणि रिचर्ड ग्लीसन यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. ग्लीसन सीएसकेकडून पदार्पण करणार आहे.
पंजाब आणि चेन्नई यांच्यात एकूण २८ सामने खेळले गेले आहेत. या सामन्यांमध्ये चेन्नईने आघाडी घेतली असून १५ सामने जिंकले आहेत, तर पंजाबला केवळ १३ सामने जिंकता आले आहेत.
एमए चिदंबरम स्टेडियमची पीच संथ आहे. मात्र, चालू मोसमात एक सामना वगळता सर्व सामन्यांमध्ये फलंदाजी चांगली झाली आहे. या सामन्यात फिरकीपटूंना मदत मिळण्याची अपेक्षा आहे. वेगवान गोलंदाजांना संथ आणि यॉर्कर्स वापरावे लागतील. अन्यथा फलंदाज वर्चस्व गाजवतील अशी अपेक्षा आहे.