सध्या मालिका विश्वामध्ये नव्या मालिकांचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. एकापाठोपाठ एक अशा अनेक नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. पण या नव्या मालिकांमुळे जुन्या मालिकांना प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागत आहे. आता कलर्स मराठी वाहिनीवर एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे समोर आले आहे. याबाबत त्या मालिकेतील कलाकारांनी माहिती दिली आहे. मालिकेतील काही कलाकारांनी सोशल मीडियावर भावूक पोस्ट शेअर केली आहे.
कलर्स मराठी वाहिनीवर लवकरच ‘इंद्रायणी’, ‘सुख कळले’, ‘हसताय ना हसायलाच पाहिजे’ आणि 'सुख कळले' या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामधील 'सुख कळले' ही मालिका २२ एप्रिल पासून रात्री ९ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नव्या मालिकेमुळे ‘रमा राघव’ मालिकेची वेळ बदलून रात्री ९.३० वाजता करण्यात आली आहे. त्यामुळे आता एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे समोर आले आहे.
कलर्स मराठी वाहिनीवर रात्री ९ वाजता लागणारी 'भाग्य दिले तू मला' ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेतील राज-कावेरीची जोडी प्रेक्षकांच्या मनावर गेल्या दोन वर्षांपासून राज्य करत होती. ४ एप्रिला २०२२ रोजी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. आता केवळ दोनच वर्षात मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याचे समोर आले आहे. मालिकेतील अभिनेत्री भाग्यश्रीने रॅपअप पार्टीचा एक व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.
वाचा: लक्ष्मीकांत बेर्डे, विजय चव्हाण, रमेश भाटकरांच्या आठवणीत मिलिंद गवळी भावूक, केली सोशल मीडियावर पोस्ट
भाग्यश्रीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर व्हिडीओ शेअर करत, “खूप सुंदर टीम आणि छान माणसं या लोकांबरोबर काम करून खूप समाधान मिळालं. ‘भाग्य दिले तू मला’ मालिकेच्या सगळ्या टीमचं खूप खूप अभिनंदन…थँक्यू मला पियू ही भूमिका साकारण्याची संधी दिल्याबद्दल” असे कॅप्शन दिले आहे. सोबतच तिने मालिकेची संपूर्ण टीम, तन्वी, विवेक, निवेदिता सराफ यांचे आभार मानले. भाग्यश्रीची ही भावनिक पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे.
वाचा: सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमुळे आमिर खान याची पोलिसात धाव, एफआयआर दाखल
‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेच्या शेवटच्या दिवसाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. मालिकेच्या टीमने आणि कलाकारांनी रॅपअप पार्टी आयोजित करुन शेवटचा दिवस आनंदाज साजरा केला. त्यांनी सेटवर केप कापला. तसेच मालिकेतील कलाकारांनी सेटवर केक कापतानाचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंवर कलाकारांनी कमेंट करत मालिका बंद होत असल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली आहे. तसेच काहींनी स्पृहा जोशी मालिका घेऊन येत असल्याने आनंद व्यक्त केला आहे.
वाचा: घरावर गोळीबार झाल्यानंतर सलमान खान याने केली सोशल मीडिया पोस्ट, व्हिडीओ शेअर करत म्हणाला...