मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  'गुलाबी साडी' गाण्यावर जॉनी लिव्हर यांचा मुलांसोबत भन्नाट डान्स, हटके स्टेप्स पाहून होईल हसू अनावर

'गुलाबी साडी' गाण्यावर जॉनी लिव्हर यांचा मुलांसोबत भन्नाट डान्स, हटके स्टेप्स पाहून होईल हसू अनावर

Aarti Vilas Borade HT Marathi
Apr 18, 2024 11:12 AM IST

बॉलिवूडमधील कॉमेडी अभिनेते म्हणून जॉनी लिव्हर ओळखले जातात. नुकताच त्यांनी मुलांसोबत 'गुलाबी साडी' गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे.

'गुलाबी साडी' गाण्यावर जॉनी लिव्हर यांचा मुलांसोबत भन्नाट डान्स, हटके स्टेप्स पाहून होईल हसू अनावर
'गुलाबी साडी' गाण्यावर जॉनी लिव्हर यांचा मुलांसोबत भन्नाट डान्स, हटके स्टेप्स पाहून होईल हसू अनावर

सध्या सोशल मीडियावर 'गुलाबी साडी' या गाण्याची क्रेझ पाहायला मिळत आहे. अनेकांनी या गाण्यावर डान्स करत व्हिडीओ शेअर केले आहेत. त्यामध्ये मग तरुण असोत वा बायका असोत सर्वजण या ट्रेंडिंग गाण्यावर मनसोक्त डान्स करताना दिसत आहेत. यामध्ये कलाकारही मागे नाहीत. काही कलाकारांनी देखील सोशल मीडियावर रिल्स शेअर केले आहेत. आता कॉमेडीचा बादशाह म्हणून ओळख असणारा अभिनेता जॉनी लिव्हरने देखील 'गुलाबी साडी' या गाण्यावर डान्स केला आहे. पण त्यांचा हा डान्स व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू अनावर होईल.

ट्रेंडिंग न्यूज

जेमीने शेअर केला व्हिडीओ

जॉनी लिव्हर यांची मुलगी जेमी ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सोशल मीडियावर सतत मजेशीर व्हिडीओ शेअर करताना दिसते. जेमीचा ही कॉमेडी कंटेंट क्रिएटर आणि अभिनेत्री देखील आहे. तसेच त्यांचा मुलगा जेसी देखील कॉमेडीयन आहे. जॉनी यांचे दोन्ही मुलांसोबत अतिशय चांगले नाते आहे. ते सतत एकमेकांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. आता त्यांचा व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
वाचा: घरावर गोळीबार झाल्यानंतर सलमान खान याने केली सोशल मीडिया पोस्ट, व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

काय आहे व्हिडीओ

'गुलाबी साडी' गाण्यावर जॉनी लिव्हर यांनी मुलगी जेमी आणि मुलगा जेसी यांच्यासोबत डान्स केला आहे. पण तिघांनीही या गाण्याच्या ट्रेंडिंग स्टेप्स फॉलो केलेल्या नाहीत. त्यांनी स्वत:च्या नव्या स्टेप्स केल्या आहेत. त्यांच्या या मजेशीर स्टेप्स पाहण्यासारख्या आहेत. त्या पाहून तुम्हाला हसू अनावर होईल. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर मजेशीर कमेंट केल्या आहेत.
वाचा: सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमुळे आमिर खान याची पोलिसात धाव, एफआयआर दाखल

नेटकऱ्यांनी केल्या मजेशीर कमेंट

जॉनी लिव्हर यांच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. एका यूजरने 'मुलीचे आणि वडिलांचे हावभाव किती सुंदर आहेत' अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका यूजरने 'जोकर कुटुंबीय' असे म्हटले आहे. तिसऱ्या एका यूजरने 'खूप सुंदर' असे म्हटले आहे. काही यूजर्सने या व्हिडीओवर हार्ट इमोजी कमेंट म्हणून केले आहेत. सध्या सोशल मीडियावर जॉनी यांचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.
वाचा: लक्ष्मीकांत बेर्डे, विजय चव्हाण, रमेश भाटकरांच्या आठवणीत मिलिंद गवळी भावूक, केली सोशल मीडियावर पोस्ट

IPL_Entry_Point

विभाग