मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  BAN W vs IND W: भारत आणि बांगलादेश यांच्यातील तिसरा टी-२० सामना आज; येथे पाहा लाईव्ह

BAN W vs IND W: भारत आणि बांगलादेश यांच्यातील तिसरा टी-२० सामना आज; येथे पाहा लाईव्ह

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
May 02, 2024 01:20 PM IST

Bangladesh Women vs India Women 3rd T20I Live Streaming: भारत आणि बांगलादेश यांच्यातील तिसरा टी-२० सामना कधी आणि कुठे लाईव्ह बघायचा? हे जाणून घेऊयात.

भारतीय क्रिकेट महिला संघ आणि बांगलादेश क्रिकेट महिला संघ आज पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत.
भारतीय क्रिकेट महिला संघ आणि बांगलादेश क्रिकेट महिला संघ आज पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत.

BAN W vs IND W 3rd T20I Live Streaming: भारतीय क्रिकेट महिला संघ आणि बांगलादेश क्रिकेट महिला संघ यांच्यातील तिसरा टी-२० सामना आज खेळला जाणार आहे. हा सामना बांगलादेशच्या शेल्हेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. दरम्यान, पाच सामन्याच्या टी-२० मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून भारताने २-० अशी आघाडी घेतली आहे. यामुळे तिसऱ्या सामन्यात भारताला पराभूत करून मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्याचे बांगलादेशचा संघ प्रयत्न करेल. दरम्यान, भारत आणि बांगलादेश यांच्यातील तिसरा टी-२० सामना लाईव्ह प्रक्षेपण कुठे पाहायचे, हे जाणून घेऊयात.

ट्रेंडिंग न्यूज

भारतीय महिला संघ बांगलादेश दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारत आणि बांगलादेश यांच्यात पाच सामन्याची मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने बांगलादेशचा ४४ धावांनी पराभव केला. त्यानंतर पावसाने व्यत्यय आणलेल्या दुसऱ्या सामन्यात भारताने डकवर्थ लुईसच्या नियमाने बांगलादेशवर १९ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. आज खेळल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात विजय मिळवून मालिका खिशात घालण्याचा भारत प्रयत्न करेल. दुसरीकडे, मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी बांगलादेशला कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकायचा असेल.

SRH vs RR Head to Head: हैदराबाद- राजस्थानममध्ये आज लढत; जाणून घ्या हेड टू हेड रेकॉर्ड आणि संभाव्य संघ

भारत- बांगलादेश यांच्यातील लाईव्ह सामना कधी, कुठे सामना?

बांगलादेश महिला आणि भारतीय महिला यांच्यातील तिसरा टी-२० सामना आज (०२ मे २०२४) शिल्हेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल. हा सामना दुपारी ३.३० वाजता सुरू होईल. यापूर्वी अर्धातास नाणेफेक होईल. भारत आणि बांगलादेश यांच्यातील तिसरा टी-२० सामना भारतातील कोणत्यातीह चॅनेलवर प्रसारित होणार नाही. हा सामना फॅनकोड ॲप आणि वेबसाइटवर थेट प्रवाहित केला जाईल.

SRH vs RR Live Streaming: पॅट कमिन्ससमोर संजू सॅमसनचे आव्हान; कधी, कुठे पाहणार हैदराबाद- राजस्थान सामना?

भारत- बांगलादेश यांच्यातील हेड टू हेड रेकॉर्ड

भारतीय महिला आणि बांगलादेश महिला यांच्यात आतापर्यंत एकूण १९ टी-२० सामने खेळले गेले आहेत. यापैकी १६ सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. तर, बांगलादेशला फक्त तीन सामने जिंकता आले. आकडेवारी पाहता भारतीय संघाचा वरचष्मा दिसून येतो. अशा परिस्थितीत बांगलादेश संघाला घरच्या मैदानावर या मालिकेत पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल.

बांगलादेश महिला संघ:

दिलारा अक्टर, मुर्शिदा खातून, शोभना मोस्तरी, निगार सुलताना (विकेटकिपर/कर्णधार), फहिमा खातून, शोर्ना अक्टर, राबेया खान, नाहिदा अक्टर, सुलताना खातून, मारुफा अक्टर, फरिहा त्रिस्ना, रुबिया हैदर, शोरिफा खातून, हबीबा इस्लाम , रितू मोनी.

भारतीय महिला संघ:

स्मृती मानधना, शफाली वर्मा, यास्तिका भाटिया, हरमनप्रीत कौर (कर्णधार), रिचा घोष (विकेटकिपर), एस साजना, पूजा वस्त्राकर, श्रेयंका पाटील, दीप्ती शर्मा, रेणुका ठाकूर सिंह, राधा यादव, दयालन हेमलता, अमनजोत कौर, सायका इशाक, तीतस साधू, आशा शोभना.

IPL_Entry_Point