मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  अंगावर शहारे आणणारा अमिताभ बच्चन यांचा व्हिडीओ, 'कल्की 2898 एडी' सिनेमातील अश्वत्थामाचा लूक चर्चेत

अंगावर शहारे आणणारा अमिताभ बच्चन यांचा व्हिडीओ, 'कल्की 2898 एडी' सिनेमातील अश्वत्थामाचा लूक चर्चेत

Aarti Vilas Borade HT Marathi
Apr 22, 2024 10:02 AM IST

बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांचा 'कल्की 2898 एडी' सिनेमातील अश्वत्थामाचा लूक व्हायरल झाला आहे.

अंगावर शहारे आणणारा अमिताभ बच्चन यांचा व्हिडीओ, 'कल्की 2898' सिनेमातील अश्वत्थामाचा लूक चर्चेत
अंगावर शहारे आणणारा अमिताभ बच्चन यांचा व्हिडीओ, 'कल्की 2898' सिनेमातील अश्वत्थामाचा लूक चर्चेत

गेल्या काही दिवसांपासून दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेते प्रभासचा 'कल्की 2898 एडी' हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटात कोणते कलाकार दिसणार? नेमके काय पाहायला मिळणार असा प्रश्न देखील उपस्थित करण्यात येत होता. आता बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटातील त्यांचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमधील त्यांचा लूक पाहून तुमच्या अंगावर शहारे येतील. सध्या सोशल मीडियावर अमिताभ बच्चन यांचा इंट्रोडक्शन व्हिडीओ चर्चेत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

काय आहे व्हिडीओ?

'कल्की 2898 एडी' या चित्रपटात अमिताभ बच्चन हे अश्वथामा ही भूमिका साकारणार आहेत. अमिताभ यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर अश्वथामा लूकचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी तोंडाला एक पट्टी गुंडाळली आहे. लांब केस, कपाळी लाल टिळक, शरीरावर झालेल्या जखमांमधून येणारे रक्त आणि शंकराची भक्ती करणारा हा व्यक्ती अश्वत्थामा आहे. या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगा त्यांना प्रश्न विचारताना दिसत आहे. त्यानंतर व्हिडीओच्या शेवटी 'माझी वेळ आली आहे. माझ्या शेवटच्या युद्धाची वेळ आली आहे' अमिताभ असे बोलताना दिसत आहेत.
वाचा: 'तारक मेहता' मालिकेतील अभिनेत्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर, बहिणीच्या निधनाने बसला धक्का

'कल्की 2898 एडी' कधी होणार प्रदर्शित?

'कल्की 2898' या चित्रपटाचे दिग्दर्शन नागा आश्विनने केले आहे. चित्रपटात प्रभास मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच अभिनेते कमल हासन, अभिनेत्री दीपिका पादूकोण आणि अमिताभ बच्चन महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाचा पहिला लूक समोर येताच चाहत्यांच्यामध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळत आहे. या चित्रपटात एक मोठे युद्ध पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट ९ मे २०२४ रोजी चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे.
वाचा: ‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेतील अभिनेता अडकला लग्नबंधनात, कलाकारांच्या हजेरीचा व्हिडीओ व्हायरल

सर्वात मोठा चित्रपट

समोर आलेल्या माहितीनुसार, 'कल्की 2898' या चित्रपटाचे आतापर्यंतच्या चित्रपटांपेक्षा जास्त बजेट आहे. जवळपास या चित्रपटासाठी ६०० कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. हा चित्रपट ९ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. पण लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्यामुळे प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे. आता अमिताभ यांचा लूकपाहून चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते.
वाचा: 'या' कारणामुळे अर्शद वारसी याने अमिताभ बच्चन यांना 'गॉडफादर' म्हणण्यास दिला होता नकार

IPL_Entry_Point