मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  LSG vs KKR Dream 11 Prediction : केएल राहुल-श्रेयस अय्यर भिडणार, ड्रीम इलेव्हनवर अशी बनवा तुमची परफेक्ट टीम

LSG vs KKR Dream 11 Prediction : केएल राहुल-श्रेयस अय्यर भिडणार, ड्रीम इलेव्हनवर अशी बनवा तुमची परफेक्ट टीम

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
May 04, 2024 10:27 PM IST

LSG vs KKR Dream 11 Prediction : केएल राहुलच्या नेतृत्वाखाली, लखनौ सुपर जायंट्स संघाची कामगिरी आतापर्यंत चांगली झाली आहे, ज्यामध्ये त्यांनी १० पैकी ६ सामने जिंकले आहेत आणि सध्या १२ गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहेत.

LSG vs KKR Dream 11 Prediction : केएल राहुल-श्रेयस अय्यर भिडणार, ड्रीम इलेव्हनवर अशी बनवा तुमची परफेक्ट टीम
LSG vs KKR Dream 11 Prediction : केएल राहुल-श्रेयस अय्यर भिडणार, ड्रीम इलेव्हनवर अशी बनवा तुमची परफेक्ट टीम

इंडियन प्रीमियर लीग २०२४ चा ५४वा सामना (५ मे) लखनौ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाइट रायडर्स संघ यांच्यात होणार आहे. उभय संघांमधील हा सामना लखनौ संघाचे घरचे मैदान असलेल्या एकना क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

केएल राहुलच्या नेतृत्वाखाली, लखनौ सुपर जायंट्स संघाची कामगिरी आतापर्यंत चांगली झाली आहे, ज्यामध्ये त्यांनी १० पैकी ६ सामने जिंकले आहेत आणि सध्या १२ गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहेत. 

कोलकाता नाईट रायडर्सच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर ते सध्या १४ गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहेत. अशा स्थितीत प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी दोन्ही संघांसाठी हा सामना जिंकणे अत्यंत आवश्यक आहे.

दरम्यान, लखनौ असो की केकेआर, दोन्ही संघांकडे तगड्या खेळाडूंची फौज आहे. अशा परिस्थितीत या सामन्यासाठी ड्रीम-इलेव्हन (Dream 11 todays match team prediction) निवडणे निश्चितच खूप कठीण काम असेल, पण येथे आम्ही तुमची काही प्रमाणात मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत.

विकेटकीपर

लखनौ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील या सामन्यातील ड्रीम इलेव्हन संघात तुम्ही केएल राहुल आणि क्विंटन डी कॉक या दोघांना यष्टीरक्षक म्हणून निवडू शकता. राहुल या मोसमात आतापर्यंत उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे, तर क्विंटन डी कॉकची बॅट गेल्या काही सामन्यांमध्ये शांत राहिली आहे, परंतु या सामन्यात तो मोठी खेळी खेळताना दिसू शकतो. 

फलंदाज

या व्यतिरिक्त तुम्ही श्रेयस अय्यर आणि व्यंकटेश अय्यर यांचा तुमच्या संघात प्रमुख फलंदाज म्हणून समावेश करू शकता. गेल्या सामन्यात श्रेयसला फलंदाजीत विशेष काही करता आले नव्हते, पण या सामन्यात तो चांगली कामगिरी करताना दिसू शकतो. याशिवाय व्यंकटेश अय्यरने मुंबईविरुद्धच्या सामन्यात अत्यंत महत्त्वाची खेळी केली होती

ऑलराऊंडर

तुम्ही तुमच्या ड्रीम इलेव्हन संघात आंद्रे रसेल, सुनील नरेन आणि मार्कस स्टॉइनिस या तीन अष्टपैलू खेळाडूंचा समावेश करू शकता. रसेल आणि नरेन बॅट आणि बॉल या दोहोंमध्ये आश्चर्यकारक कामगिरी करतात. तर मार्कस स्टॉइनिसकडून गेल्या काही सामन्यांमध्ये अशीच कामगिरी पाहायला मिळत आहे. 

गोलंदाज

प्रमुख गोलंदाजांमध्ये तुम्ही वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, मिचेल स्टार्क आणि मोहसिन खान यांचा समावेश करू शकता.

नरेन कर्णधार तर राहुल उपकर्णधार 

लखनऊ आणि केकेआर यांच्यातील या सामन्याच्या ड्रीम इलेव्हन संघात, तुम्ही सुनील नरेनला कर्णधार म्हणून निवडू शकता, जो तुम्हाला फलंदाजीसह गोलंदाजीमध्ये गुण मिळवून देऊ शकेल. लखनौच्या खेळपट्टीवर आतापर्यंत फिरकी गोलंदाज अधिक प्रभावी दिसले आहेत, त्यामुळे नरेन महत्त्वाची भूमिका बजावताना दिसू शकतो. 

उपकर्णधार म्हणून तुम्ही केएल राहुलची निवड करू शकता, ज्याने आतापर्यंत बॅटने उत्कृष्ट फॉर्म दाखवला आहे आणि त्याची बॅट लखनौच्या मैदानावर चांगलीच चालते.

LSG vs KKR Dream 11 Prediction

विकेटकीपर - केएल राहुल (उपकर्णधार), क्विंटन डी कॉक.

फलंदाज - श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर.

अष्टपैलू - आंद्रे रसेल, सुनील नरेन (उपकर्णधार), मार्कस स्टॉइनिस.

गोलंदाज - रवी बिश्नोई, मोहसिन खान, वरुण चक्रवर्ती, मिचेल स्टार्क.

IPL_Entry_Point