मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  T20 WC 2024 : वर्ल्डकप संघात नाव येताच भारतीय खेळाडू फ्लॉप, तर ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी दाखवला खरा रंग, पाहा

T20 WC 2024 : वर्ल्डकप संघात नाव येताच भारतीय खेळाडू फ्लॉप, तर ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी दाखवला खरा रंग, पाहा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
May 04, 2024 04:37 PM IST

T20 world cup 2024 : टी-20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा झाली. त्यानंतर भारताचे अनेक खेळाडू शुन्यावर बाद झाले. तर वर्ल्डकपसाठी ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा झाल्यानंतर त्यांचे खेळाडू फॉर्मात परत आल्याचे दिसले आहे.

T20 WC 2024 : वर्ल्डकप संघात नाव येताच भारतीय खेळाडू फ्लॉप, तर ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी दाखवला खरा रंग, पाहा
T20 WC 2024 : वर्ल्डकप संघात नाव येताच भारतीय खेळाडू फ्लॉप, तर ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी दाखवला खरा रंग, पाहा

Indian And Australian Players In IPL 2024 : टी-20 विश्वचषकासाठी अनेक संघांनी आपले संघ जाहीर केले आहेत. विश्वचषकासाठी भारतीय संघाचीही घोषणा करण्यात आली आहे. मात्र संघ जाहीर होताच भारतीय खेळाडू फ्लॉप होताना दिसत आहेत. 

ट्रेंडिंग न्यूज

तर दुसरीकडे, विश्वचषक जवळ येत असल्याचे पाहून ऑस्ट्रेलियन खेळाडू फॉर्ममध्ये परतत आहेत. विश्वचषकापूर्वी भारतीय खेळाडूंचे फ्लॉप होणे ही मोठी समस्या ठरू शकते.

ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे फॉर्ममध्ये येणे केवळ भारतासाठीच नाही तर टी-20 विश्वचषक खेळणाऱ्या संघांसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. २०२३ मध्ये भारतात खेळल्या गेलेल्या एकदिवसीय विश्वचषकाचे विजेतेपद ऑस्ट्रेलियाने पटकावले होते. आता अशा परिस्थितीत कांगारू संघ टी-20 विश्वचषकासाठी प्रबळ दावेदार ठरू शकतो.

वर्ल्डकप संघात नाव येताच भारतीय खेळाडू फ्लॉप

टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा झाल्यानंतर आयपीएलमध्ये खेळाडूंचा फ्लॉप शो सुरू झाला आहे. सर्वप्रथम संघाचा कर्णधार रोहित शर्मा फ्लॉप झाला. याआधीही रोहित आयपीएलमध्ये फ्लॉप दिसत होता. विश्वचषकासाठी संघाची निवड झाल्यानंतर केकेआरविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात रोहित शर्मा केवळ ११ धावाच करू शकला. यापूर्वी लखनौविरुद्धच्या सामन्यात भारतीय कर्णधाराने केवळ ४ धावा केल्या होत्या.

याशिवाय संजू सॅमसन, हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे हे टी-20 विश्वचषकाचा संघ जाहीर झाल्यानंतर शून्यावर बाद झाले. तर सूर्यकुमार यादवने लखनौविरुद्ध केवळ १० धावांची इनिंग खेळली. याशिवाय अष्टपैलू रवींद्र जडेजाही फ्लॉप झाला, तो पंजाबविरुद्ध केवळ २ धावांवर बाद झाला आणि गोलंदाजीत त्याला एकही बळी घेता आला नाही.

वर्ल्डकप संघात नाव येताच ऑस्ट्रेलियन खेळाडू फॉर्मात आले

 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा झाल्यानंतर मिचेल स्टार्क पहिल्यांदाच फॉर्ममध्ये दिसला. आत्तापर्यंतच्या संपूर्ण मोसमात फ्लॉप ठरलेल्या केकेआरच्या मिचेल स्टार्कने मुंबईविरुद्धच्या सामन्यात अवघ्या ३३ धावांत ४ बळी घेतले.

याशिवाय लखनौकडून खेळणाऱ्या मार्कस स्टॉइनिसने मुंबईविरुद्ध ६२ धावांची शानदार खेळी केली. या मोसमात सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार असलेल्या पॅट कमिन्सने राजस्थान रॉयल्सविरुद्ध शानदार गोलंदाजी करत ३४ धावांत २ बळी घेतले.

IPL_Entry_Point