मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता आणि लेखक चिन्मय मांडलेकर सध्या वेगळ्याच कारणामुळे ट्रोल होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी त्याने एका पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याच्या मुलाच्या नावाचा उल्लेख केला होता. चिन्मय मांडलेकर त्याच्या मुलाचे नाव ‘जहांगीर’ असे ठेवले आहे. ते ऐकून नेटकऱ्यांनी अभिनेत्याला आणि त्याच्या कुटुंबाला प्रचंड ट्रोल करण्यास सुरुवात केली. त्यानंतर चिन्मयने यापुढे कधीही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार नसल्याचे सांगितले. त्याच्या या निर्णयानंतर इंडस्ट्रीमधील अनेकांनी त्याच्या साठी पोस्ट केली आहे.
अभिनेत्री गौतमी देशपांडेने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला चिन्मय मांडलेकरचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने, 'कलाकारांना अशा प्रकारची वागणूक देण्यात येते का? असे सॉफ्ट टार्गेट बनवायचे असेल तर लोकांची लायकी नाही काही चांगलं मिळवण्याची... हे पाहून अतिशय वाईट आणि निराशजनक वाटले. हे असे व्हायला नको होते. चिन्मय आमचा तुला कायमच पाठिंबा आहे' या आशयाचे कॅप्शन दिले आहे.
वाचा: 'तारक मेहता' मालिकेतील अभिनेत्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर, बहिणीच्या निधनाने बसला धक्का
गौतमी पाठोपाठ तिची बहिण आणि निर्माती अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने देखील चिन्मय मांडलेकरला पाठिंबा दिला आहे. तिने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर चिन्मयचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने, 'अजून किती' असा प्रश्न उपस्थित केला आहे. सध्या सोशल मीडियावर या दोघींच्याही पोस्ट व्हायरल झाल्या आहेत. त्यांच्यासोबत अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने देखील पोस्ट केली आहे.
वाचा: 'या' कारणामुळे अर्शद वारसी याने अमिताभ बच्चन यांना 'गॉडफादर' म्हणण्यास दिला होता नकार
सिद्धार्थ चांदेकरने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर चिन्मयचा व्हिडीओ शेअर केला आहे. “जहांगीरच्या नावावरून घाणेरड्या भाषेत ट्रोल करणाऱ्या लोकांना महाराजांशी किंवा त्यांच्या महान विचारांशी काहीही घेणं देणं नाहीये. आपल्या मनातली वाईट शब्द आणि सर्व घाण बाहेर काढणे हाच त्यांचा धर्म व उद्योग आहे. तू महाराजांची भूमिका खूप निष्ठेने आणि प्रामाणिकपणे वठवली आहेस. कलाकार म्हणून आम्ही सगळेच त्यासाठी तुझा कायम आदर करतो. ही भूमिका करणे तू अजिबात थांबवू नकोस. प्लीज! आम्ही सगळे तू, नेहा आणि जहांगीरसोबत उभे आहोत” असे सिद्धार्थ व्हिडीओ शेअर करत म्हणाला.
वाचा: ‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेतील अभिनेता अडकला लग्नबंधनात, कलाकारांच्या हजेरीचा व्हिडीओ व्हायरल