बॉलिवूड इंडस्ट्रीमधील पापाराजींसोबत जुळून घेणे कलाकारांची गरज किंवा मजबूरी ठरली आहे. अनेकदा कलाकार हे फोटोग्राफर्सच्या वागण्याला कंटाळलेले असतात. काही दिग्गज कलाकारांनी तर पापाराजींवर संताप व्यक्त केला आहे. अनेकदा पापाराजी हे महिला अभिनेत्रींच्या मागेच फिरताना दिसतात. मग ते जीम बाहेर असो किंवा एखाद्या रेस्टॉरंट बाहेर पापाराजी कायमच उपस्थित असतात. अभिनेत्रींना मनाविरुद्ध फोटोला पोझ द्यावी लागते. आता यावर डान्सर नोरा फतेहीने प्रतिक्रिया दिली आहे.
अभिनेत्री मृणाल ठाकूर, पलक तिवारी आणि तापसी पन्नू कायमच पापाराजींना न जुमानता निघून जातात. पलक तिवारीने तर अनेकदा फोटोग्राफर्सला फोटो काढताना बजावले आहे. आता नेहमीच बोल्ड अंदाजात दिसणाऱ्या नोरा फतेहीने एका मुलाखतीमध्ये पापाराजींच्या फोटो काढण्यावर प्रतिक्रिया दिली आहे. तिने पापाराजी काढत असलेल्या फोटोंवर आक्षेप व्यक्त केला आहे.
वाचा: मृण्मयी आणि गौतमी देशपांडेचा चिन्मय मांडलेकर याला पाठिंबा, सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल
नोराने नुकताच न्यूज १८ लोकमतला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये 'मला असे वाटते की त्यांनी असे हिप्स पहिल्यांदाच पाहिले आहेत. मला असे वाटते की हेच खरे आहे. मीडिया माझ्यासोबतच नाही तर इतर महिला अभिनेत्रींसोबतही असे करते. ते तुमच्या हिप्सवर झूम नाही करणार कारण ते इतके एक्सायटिंग नाही. पण इतर प्रायवेट पार्ट्सवर ते गरज नसताना झूम करतात. याची खरच गरज नसते. त्यांना नेमके काय करयचे असते ते तुम्हाला माहिती' असे नोरा म्हणाली.
वाचा: अंगावर शहारे आणणारा अमिताभ बच्चन यांचा व्हिडीओ, 'कल्की 2898 एडी' सिनेमातील अश्वत्थामाचा लूक चर्चेत
नोरा फतेहीने सांगितले की दुर्दैवाने या सगळ्या गोष्टी सोशल मीडियावर ट्रेंड होताना दिसतात. ते सोशल मीडियावर केवळ अल्गोरिदम सेट करत असतात. देवाने मला खूप सुंदर शरीर दिले आहे आणि मला त्याचा अभिमान आहे. मला माझ्या शरीराची जराही लाज वाटत नाही. झूम करण्यामागचा त्यांचा हेतू वाईट नसेल पण तो वादाचा एक वेगळा मुद्दा आहे. मी कोणाची कॉलर पकडून त्याला धडा शिकवू शकत नाही. पण मी नेहमी ठरवलेल्या माझ्या मार्गावर चालते आणि मी माझ्या शरीराबात अतिशय कम्फर्टेबल आहे. सुंदरता ही पाहणाऱ्याच्या डोळ्यामध्ये असते.
वाचा: रंगभूमीवर एक अनोखा प्रयोग! पहिल्या मराठी AI महाबालनाटकामध्ये 'ही' अभिनेत्री करणार काम