मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  गौरव मोरे करतोय बॉलिवूड अभिनेत्री जुही चावला सोबत रोमॅन्स, मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

गौरव मोरे करतोय बॉलिवूड अभिनेत्री जुही चावला सोबत रोमॅन्स, मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Aarti Vilas Borade HT Marathi
Apr 24, 2024 08:26 AM IST

सध्या सोशल मीडियावर अभिनेता गौरव मोरे याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये गौरव बॉलिवूड अभिनेत्री जुही चावलासोबत रोमॅन्स करताना दिसत आहे.

गौरव मोरे करतोय बॉलिवूड अभिनेत्री जुही चावला सोबत रोमॅन्स, मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
गौरव मोरे करतोय बॉलिवूड अभिनेत्री जुही चावला सोबत रोमॅन्स, मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेता म्हणून गौरव मोरे ओळखला जातो. त्याने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या मनात घर केले. या कार्यक्रमातून गौरव महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला. त्याला खरी ओळख मिळाली. त्यानंतर त्याने काही मराठी चित्रपटांमध्ये काम केले. त्याच्या प्रत्येक भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केले. सध्या गौरव एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तो थेट बॉलिवूड अभिनेत्रीसोबत रोमॅन्स करताना दिसत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

काय आहे व्हिडीओ?

गौरव मोरेचा व्हिडीओ सोनी टीव्हीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ कॉमेडी हिंदी शो 'मॅडनेस मचाएंगे'च्या मंचावरचा आहे. व्हिडीओच्या सुरुवातीलाच गौरव हातात गुलाबाच्या पाकळ्या घेऊन स्टेजवर येतो. त्या पाकळ्यांचा तो जुहीच्या अंगावर वर्षाव करतो. त्यानंतर तिला गुलाबाचे फूल देतो. बॅकग्राऊंडला शाहरुख खानचे 'तु है मेरी किरण' हे गाणे सुरु असल्याचे दिसत आहे.
वाचा: 'हसताय ना? हसायलाच पाहिजे!' शो नेमकं काय पाहायला मिळणार? नव्या प्रोमोने वेधले सर्वांचे लक्ष

काय आहे नेमके प्रकरण?

गौरव हा 'मॅडनेस मचाएंगे' या कार्यक्रमात कॉमेडीयन सुगंधासोबत स्कीट करत असतो. तसेच याच भागात जुही चावला ही पाहुणी परिक्षक म्हणून आली आहे. आता गौरव या संधीचे सोने करतो. तो जुहीसोबत रोमँटिक अंदाजात दिसत आहे. पण तो सादर करत असलेल्या स्कीटने सर्वांचे लक्ष वेधले आहे. सुंगधा या स्कीटमध्ये यूही चावलाची भूमिका साकारते. तर गौरव ऑनलाइन मागवलेल्या शाहरुख खानचे पात्र साकारतो. त्यांचे हे मजेशीर स्कीट प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळणार आहे.
वाचा: 'प्रायवेट पार्टवर ते उगाच झूम करतात', डान्सर नोरा फतेहीने साधला पापाराजींवर निशाणा

काय आहे कार्यक्रम?

'मॅडनेस मचाएंगे' हा कार्यक्रम दर शनिवार आणि रविवारी सोनी टीव्हीवर रात्री साडेनऊ वाजता लागतो. या कार्यक्रमात गौरव मोरेसोबतच मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवी आणि कुशल बद्रिके हे देखील काम करत आहे. त्यामुळे प्रेक्षकांमधील उत्सुकता आगामी भागाविषयीची शिगेला पोहोचली आहे.
वाचा: चिन्मय मांडलेकर याच्या निर्णयानंतर दिग्पाल लांजेकरची पहिली प्रतिक्रिया, “महाराजांची भूमिका…”

गौरवच्या कामाविषयी

गौरव मोरेच्या कामाविषयी बोलायचे झाले तर त्याचा अल्याड पल्याड हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा एक ससपेंस थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटाची सर्वजण आतुरतेने वाट पाहात आहे. यापूर्वी त्याचा लंडन मिसण आणि बॉईज ४ हे चित्रपट प्रदर्शित झाले होते.

IPL_Entry_Point