मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या सुपरहिट सिनेमातून पदार्पण करणाऱ्या वरुण धवन याच्याकडे एकूण किती संपत्ती?

‘स्टुडंट ऑफ द इयर’ या सुपरहिट सिनेमातून पदार्पण करणाऱ्या वरुण धवन याच्याकडे एकूण किती संपत्ती?

Aarti Vilas Borade HT Marathi
Apr 24, 2024 07:54 AM IST

अभिनेता वरुण धवन याने 'स्टुडंट ऑफ द इयर’ या सुपरहिट सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आज त्याच्याकडे एकूण किती संपत्ती आहे चला जाणून घेऊया...

‘स्टुडंट ऑफ द इयर’ या सुपरहिट सिनेमातून पदार्पण करणाऱ्या वरुण धवन याच्याकडे एकूण किती संपत्ती?
‘स्टुडंट ऑफ द इयर’ या सुपरहिट सिनेमातून पदार्पण करणाऱ्या वरुण धवन याच्याकडे एकूण किती संपत्ती?

आपल्या लूक्सने आणि दमदार अभिनयाने बॉलिवूडवर छाप सोडून चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता म्हणजे वरुण धवन. त्याचा आज ३७ वा वाढदिवस आहे. वरुणने करण जोहर दिग्दर्शित ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटात काम करत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तो अनेक सुपरहिट चित्रपटांत काम करताना दिसला. सोबतच वरुणने काही चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून देखील काम केले आहे. त्याच्या प्रत्येक चित्रपटांमध्ये त्याच्या लूक्स, अभिनय आणि फॅशनने चाहत्यांना घायाळ करत असतो. आजपर्यंतच्या त्याच्या १० वर्षांच्या कारकिर्दीत त्याने अनेक सुपरडूपर हिट चित्रपट दिले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

अभिनेता वरुण धवन हा प्रसिद्ध दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा मुलगा आहे. त्याचे वडिलच दिग्दर्शक असल्याने त्याला काम मिळवण्यासाठी कोणतीही वेगळी अशी मेहनत करावी लागली नसेल असा समज अनेकांचा होता. पण तसे अजिबात नाही. वरुणला चांगल्या आणि प्रभावशाली भूमिका मिळवण्यासाठी फार संघर्ष करावा लागला होता. हळूहळू त्याला चित्रपटांमध्ये लिड रोल मिळू लागले. त्याने अभिनेता शाहरुख खानच्या ‘माय नेम इज खान’ या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते.
वाचा: 'प्रायवेट पार्टवर ते उगाच झूम करतात', डान्सर नोरा फतेहीने साधला पापाराजींवर निशाणा

बॉलिवूडमध्ये मेहनतीने मिळवली जागा...

वरुण धवनाल वडिलांकडून अभिनयाचा वारसा आला असला तरी त्याने कष्ट करत बॉलिवूडमध्ये वेगळे स्थान मिळवले आहे. जेव्हा वरुणच्या पहिल्या चित्रपटाचे शूटिंग सुरु होते तेव्हा त्याचे वडील डेव्हिड धवन हे एकदाही सेटवर गेले नाहीत किंवा मुलगा काय करतोय हे पाहायला गेलेले नाही. मुलाने नेहमी आपल्या कष्टाने आयुष्यात हवे ते मिळवायला हवे, असे त्यांना वाटत होत. हिच गोष्ट वरुणने आजतागायत फॉलो केली आहे.
वाचा: चिन्मय मांडलेकर याच्या निर्णयानंतर दिग्पाल लांजेकरची पहिली प्रतिक्रिया, “महाराजांची भूमिका…”

वरुण धवनकडे कोट्यवधीची संपत्ती

मीडिया रिपोर्ट्स नुसार, वरुणकडे एकूण ४११ कोटी रुपयांची संपत्ती आहे. तो वर्षाकाठी २० कोटी रुपये कमावतो. शिवाय त्याची जाहिरातींतूनही कमाई होते. त्याच्याकडे मुंबईतल्या जुहू सारख्या पॉश ठिकाणी ३० कोटी रुपयांचा फ्लॅट आहे. काही वर्षांपूर्वी त्याने गर्लफ्रें नताशा दलाल सोबत लग्नगाठ बांधली. त्यानंतर तो नव्या फ्लॅटमध्ये शिफ्ट झाला होता. आता तो लवकरच बाबा होणार आहे. घरासोबतच वरुणकडे अनेक महागड्या गाड्यांचे कलेक्शनदेखील आहे. त्यामध्ये ऑडी आणि मर्सिडीज अशा प्रसिद्ध गाड्यांचा समावेश आहे.
वाचा: 'हसताय ना? हसायलाच पाहिजे!' शो नेमकं काय पाहायला मिळणार? नव्या प्रोमोने वेधले सर्वांचे लक्ष

IPL_Entry_Point

विभाग