Video: पोझ देत असताना जोरात वारा आला अन्...; ऊप्स मोमेंटची शिकार झाली हृतिकची पूर्व पत्नी सुझान खान
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Video: पोझ देत असताना जोरात वारा आला अन्...; ऊप्स मोमेंटची शिकार झाली हृतिकची पूर्व पत्नी सुझान खान

Video: पोझ देत असताना जोरात वारा आला अन्...; ऊप्स मोमेंटची शिकार झाली हृतिकची पूर्व पत्नी सुझान खान

Aarti Vilas Borade HT Marathi
Apr 25, 2024 09:02 AM IST

सुझान खान नुकताच संजय लीला भन्साली यांच्या हीरामंडीच्या स्क्रीनिंगला पोहोचली होती. त्यावेळी कॅमेराला पोझ देत असताना अचानक वारा आला अन्..., पाहा व्हिडीओ

पोझ देत असताना जोरात वारा आला अन्...; ऊप्स मोमेंटची शिकार झाली हृतिकची पूर्व पत्नी सुझान खान
पोझ देत असताना जोरात वारा आला अन्...; ऊप्स मोमेंटची शिकार झाली हृतिकची पूर्व पत्नी सुझान खान

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनची पूर्व पत्नी सुझान खानने भलेही अभिनयात पदार्पण केले नसले तरी तिचा चाहता वर्ग मोठा आहे. सुझान सतत कोणत्या ना कोणत्या कारणांने सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. हृतिकला घटस्फोट दिल्यानंतर ती अभिनेता अर्सलन गोणीला डेट करत आहे. ते दोघे कायमच एकत्र फिरताना दिसतात. सध्या सुझान एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे. तिचा Oops Momentचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सुझान खानने बॉयफ्रेंड अर्सलन गोणीसोबत दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या नेटफ्लिक्सवरील 'हीरामंडी' चित्रपटाच्या स्क्रीनिंगला हजेरी लावली. यावेळी सुझानने परिधान केलेल्या काळ्या रंगाच्या कपड्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिने काळ्या रंगाचा शॉर्ट स्कर्ट आणि टॉप परिधान केला होता. मोकळे केस, गळ्यात नेकलेस आणि हातात भगव्या रंगाची पर्स घेऊन सुझान प्रिमिअरला पोहोचली होती. याच दरम्यान, सुझान ऊप्स मोमेंटची शिकार झाली आहे.
वाचा: गौरव मोरे करतोय बॉलिवूड अभिनेत्री जुही चावला सोबत रोमॅन्स, मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

काय झाले नेमके?

सुझान 'हीरामंडी'च्या स्क्रीनिंगला बॉयफ्रेंड अर्सलन गोणीसोबत पोहोचली होती. सुझानला पाहून फोटोग्राफर्सने फोटोसाठी पोझ देण्याची विनंती केली. सुझान आणि अर्सलन फोटोसाठी पोझ देत होते. तेवढ्यात जोराता वारा आला आणि सुझानचा स्कर्ट उडू लागला. सुझान पटकन तेथून निघून गेली. पण जे काही घडले ते कॅमेरामध्ये कैद झाले. सध्या सोशल मीडियावर सुझानचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.
वाचा: 'मी केलेल्या त्यांच्या मिमिक्रीवर...', निलेश साबळेने सांगितला राज ठाकरे यांच्या भेटीचा किस्सा

नेटकऱ्यांनी केल्या कमेंट

सुझानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच एका यूजरने 'हृतिकला सोडून कोणासोबत फिरत आहेस' असा प्रश्न विचारला आहे. तर दुसऱ्या एका यूजरने 'असे कपडे का घालतेसे ज्यामध्ये तू कम्फर्टेबल नाहीस' अशी कमेंट केली आहे. तिसऱ्या एका यूजरने 'असे कपडे घातले की असेच होणार' असे म्हटले आहे. चौथ्या एका यूजरने 'तू स्वत:ची काळजी घेऊ शकत नाही का? हृतिक असता तर असे घडले नसते' असे म्हणत नाराजी व्यक्त केली आहे. अनेकांनी घडलेल्या प्रकारावरुन सुझानला चांगलेच सुनावले आहे.
वाचा: माधवीने मुक्ता हिच्याकडून घेतले दिल्लीला जाण्याचे वचन, सई जाणार का सोबत? 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत नवे वळण

Whats_app_banner