मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  माधवीने मुक्ता हिच्याकडून घेतले दिल्लीला जाण्याचे वचन, सई जाणार का सोबत? 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत नवे वळण

माधवीने मुक्ता हिच्याकडून घेतले दिल्लीला जाण्याचे वचन, सई जाणार का सोबत? 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत नवे वळण

Aarti Vilas Borade HT Marathi
Apr 24, 2024 10:55 AM IST

'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सध्या नवे वळण आले आहे. मुक्ता हिला कोळी कुटुंबीयांनी घराबाहेर काढले आहे. त्यानंतर मुक्ताची आई माधवीने तिच्याकडून दिल्लीला जाण्याचे वचन घेतले आहे.

माधवीने मुक्ता हिच्याकडून घेतले दिल्लीला जाण्याचे वचन, सई जाणार का सोबत? 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत नवे वळण
माधवीने मुक्ता हिच्याकडून घेतले दिल्लीला जाण्याचे वचन, सई जाणार का सोबत? 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत नवे वळण

'प्रेमाची गोष्ट' मालिकेत मुक्ता ही हतबल झाली आहे. तिला सईची आई होण्याची जबादारी निभवायची असते. तसेच सागरच्या मनात असलेल्या भावना देखील समजून घ्यायच्या असतात. पण सागर आदित्यला बरे वाटावे म्हणून मुक्ताविषयी मनात काही नाही असे बोलतो. पण हे सगळं मुक्ता ऐकते आणि सर्व काही बदलते. तेव्हा मुक्ता सागरशी बोलणे टाळत आली आहे. आजच्या भागात मालिकेत काय होणार जाणून घेऊया..

ट्रेंडिंग न्यूज

छोट्या सईने सांगितले

कोळी कुटुंबीयांनी मुक्ताला घराबाहेर काढल्याचे कळतात सावनी या संधीचा फायदा घेते. ती न्यायाधिशांना घरी बोलावून घेते आणि घडलेला प्रकार सांगते. मात्र, कोळी आणि गोखले कुटुंबीय एकत्र येऊन हे सगळा सावनीचा डाव असल्याचे सांगतात. या सगळ्यात सईच खरे सांगू शकते असे सावनी म्हणते. सावनीला मुक्ता आई कुठे राहते असा प्रश्न विचारताच ती आमच्यासोबत राहते असे ती सांगते.
वाचा: 'प्रायवेट पार्टवर ते उगाच झूम करतात', डान्सर नोरा फतेहीने साधला पापाराजींवर निशाणा

न्यायाधिशांनी सांगितला त्यांचा निर्णय

सईने दिलेल्या प्रश्नाचे उत्तर ऐकून न्यायाधिशांना धक्का बसतो. ते सईला वचन देतात की मी तुला कधीही तुझ्या मुक्ता आईपासून लांब करणार नाही. तू कायमच तुझ्या मुक्ता आईकडे आनंदाने रहा. त्यानंतर सावनी मुद्दामून दिल्लीचा विषय काढते. मुक्ता दिल्लीला गेस्ट लेक्चरर म्हणून जाणार असल्याचे सांगते. त्यावर सागर उत्तर देत म्हणतो की, मुक्ता सईला देखील घेऊन जाणार आहे. तिच्या करिअरवर कुठल्या गोष्टींचा परिणाम व्हायला नको म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आहे.
वाचा: 'हसताय ना? हसायलाच पाहिजे!' शो नेमकं काय पाहायला मिळणार? नव्या प्रोमोने वेधले सर्वांचे लक्ष

माधवीने मुक्ताकडून वचन

कोळी कुटुंबीय जे काही वागले आहेत त्यामुळे पुरुषोत्तम आणि माधवीला प्रचंड त्रास झाला आहे. त्यांना आपल्या मुलीला कोळींच्या घरी पुन्हा पाठवयाचे नसते. माधवी मुक्ताला जरा भावनिक दुनियेतून बाहेर ये आणि प्रॅक्टीकल विचार करुन निर्णय घे असे सांगते. तसेच दिल्लीवरुन आलेल्या संधीचे सोने करण्याचे देखील ती वचन घेते. आता मुक्ता मालिकेच्या आगामी भागात काय निर्णय घेणार? ती सईला सोबत घेऊन जाणार की नाही? हे स्पष्ट होणार आहे. मालिकेत पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी आजचा भाग पाहावा लागणार आहे.
वाचा: चिन्मय मांडलेकर याच्या निर्णयानंतर दिग्पाल लांजेकरची पहिली प्रतिक्रिया, “महाराजांची भूमिका…”

IPL_Entry_Point