मल्टीप्लेक्सची चेन असणाऱ्या पीव्हीआर आणि आयनॉक्स कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे. मल्टीप्लेक्समध्ये येणाऱ्या प्रेक्षकांच्या संख्येत होणारी घट पाहून त्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांनी थिएटरमध्ये चित्रपट दाखवताना जाहिरात फ्री जाण्याचा निर्णय घेतला आहे. ही सुविधा प्रीमिअर स्क्रीन असणाऱ्या थिएटरमध्ये सुरु करण्यात आली आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये बॉलिवूडमधील मोठे चित्रपट देखील खराब प्रदर्शन करताना दिसत आहेत. चित्रपटात मोठमोठे कलाकार असताना देखील चित्रपट फारशी कमाई करत नसल्याचे दिसत आहे.
वाचा: ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या सुपरहिट सिनेमातून पदार्पण करणाऱ्या वरुण धवन याच्याकडे एकूण किती संपत्ती?
पीव्हीआर आयनॉक्स लिमिटेडच्या द लग्जरी कलेक्शन अँड इनोवेशनचे प्रमुख रेनॉड पॅलिएरे सांगितले की, इंटरवलमध्ये प्रेक्षकांना प्रीमिअर स्क्रीनवर जाहिराती दाखवल्या जाणार नाहीत. त्याऐवजी प्रेक्षकांना आगामी चित्रपटांचे ट्रेलर दाखवण्यात येणार आहेत. कंपनीने चित्रपटांदरम्यान जाहिरात न दाखवण्याच्या निर्यणानंतर एक नवा प्लान आणला आहे. रेनॉड पॅलिएरने सांगितले की, प्रत्येक शोमधील वेळ वाचवल्यामुळे आम्हाला आणखी एक शो वाढवता येणार आहे. यामुळे आणखी प्रेक्षक चित्रपटगृहामध्ये येण्याची शक्यता आहे.
वाचा: गौरव मोरे करतोय बॉलिवूड अभिनेत्री जुही चावला सोबत रोमॅन्स, मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
पॅलिएरे यांनी सांगितले की जाहिरात न दाखवल्यामुळे महसूल नुकसान होणार आहे. त्यासाठी आम्ही दिवसभरात एक आणखी शो वाढवला आहे. ज्यामुळे दर्शकांची संख्या वाढेल ज्यामुळे महसूल भरपाई होईल. समोर आलेल्या माहितीनुसार, डिसेंबर महिन्यात कंपनीचा महसूल जाहिरातीच्या माध्यमातून २३ टक्के जवळपास वाढला होता. त्यामुळे महसूल १४०.५ कोटी रुपयांवर पोहोचला होता. हा महसूल २०२४ या वर्षात जवळपास १५ टक्के कमी झाला आहे.
वाचा: 'मी केलेल्या त्यांच्या मिमिक्रीवर...', निलेश साबळेने सांगितला राज ठाकरे यांच्या भेटीचा किस्सा
पॅलिएरे यांनी सांगितले की चित्रपट सुरु होणाऱ्यापूर्वीच्या १० मिनिटाच्या वेळात आगामी चित्रपटांचे ट्रेलर दाखवण्यात येणार आहेत. यामाध्यामातून आम्ही प्रेक्षकांचे लक्ष वेधण्याचे काम करणार आहोत. त्यासाठी आम्ही पेप्सी आणि कोक सारखे ब्रँड स्क्रीनवर दाखवणार आहोत. या सुविधा १ एप्रिल पासून मुंबई, दिल्ली, बंगळूरु या शहरांमध्ये लाँच करण्यात येणार आहे. आता पीव्हीआर आयनॉक्सने आणलेल्या या नव्या प्लानचा किती फायदा होते हे आगामी भागात कळणार आहे.