27 april 2024 horoscope : आज शनिवार (२७ एप्रिल) संकष्ट चतुर्थीचा चंद्रमा रवि, शुक्र आणि हर्शलशी षडाष्टक योग करीत असुन मंगळाच्या राशीतुन आणि बुधाचा नक्षत्रातुन गोचर करीत आहे. अशा स्थितीत सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक या राशींसाठी आजचा दिवस कसा जाईल? ते जाणून घेऊया.
सिंह - आज शुभ स्थानात चंद्र असणार आहे. आपली कामे करून घेण्यासाठी एखादे वेळी पडती बाजू घेतली तरी चालणार आहे. परदेशी गोष्टी खरेदीचे योग येतील. स्वच्छंदीपणा थोडी स्वार्थी वृत्ती ठेवणार आहात. घरा मध्ये तुमच्या नवीन विचारांचे स्वागत होईल. आर्थिक निर्णय जबाबदारीने घ्यावे लागतील. दुसऱ्याच्या मनात काय चालले आहे याचा थांगपत्ता तुम्हाला बरोबर लागणार आहे. पूर्ण स्वार्थ व स्वार्थ त्याग अशा दोन पराकोटीच्या भावनांना सामोरे जाणार आहात. व्यापारात मोठी गुंतवणूक करण्याचा विचार करीत असाल तर टाळा. अंहकारवृत्ती मुळे मित्रमैत्रिणी दुरावण्याची शक्यता आहे.
शुभ रंगः लालसर शुभ दिशाः पूर्व. शुभ अंकः ०५, ०९.
कन्या- आज चंद्राशी होणारा योग पाहता प्रतिकुल परिणाम येण्याची शक्यता आहे. तुमच्याकडे चांगुलपणा असला तरी कधी कधी तुमचे वागणे सहनशक्तीच्या पलिकडे राहील. आपल्या हातून घडलेली एखादी चूक प्रांजळपणे कबूल करून तुम्ही रिकामे होणार आहात. फाजील आत्मविश्वासामुळे तुमचे अंदाज चुकण्याची शक्यता आहे. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीची कला नजरेत भरण्यासारखी समोर येईल. घरामध्ये स्फूर्तीदायक वातावरण निर्माण होईल. व्यापार उद्योग क्षेत्रात मोठे निर्णय घेऊ नयेत. भागीदारा सोबत वाद विवाद टाळा.
शुभ रंगः पोपटी शुभ दिशाः उत्तर. शुभ अंकः ०२, ०६.
तुळ - आज रवि-चंद्र युतीयोगात समाजामध्ये पुढारीपण मिळण्याची ताकद तुमच्याकडे येईल. अविचाराने घेतलेला कोणताही निर्णय आर्थिक व्यय होण्यासाठी कारणीभूत ठरेल. परदेशगमनाचे योग येतील. तुमचा धाडसी स्वभाव उफाळून वर येईल. विद्यार्थ्यांना अभ्यासाबाबत गोडी निर्माण होईल. नोकरीमध्ये अनुकुल बदल होईल. हितशत्रु आणि विरोधकांवर मात कराल. रखडलेल्या कामास गती मिळेल. कौटुंबिक पातळीवर वातावरण चांगले राहिल. व्यापार रोजगारात अनुकूल असा प्रतिसाद मिळेल. संततीकडून आनंदाची बातमी कळेल. शेअर्समध्ये दिर्घकालीन गुंतवणूक लाभ देणार आहे.
शुभ रंग: भगवा शुभ दिशा: आग्नेय. शुभ अंकः ०२, ०४.
वृश्चिक- आजच्या चंद्र गोचरात व्यापारात विवाहेच्छूकांचे विवाह ठरतील. जोडीदार उत्तम आणि सुसंस्कृत मिळेल. आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे तेवढाच खर्चिकपणाही वाढेल. अंधश्रद्धा ठेवण्यापेक्षा डोळसपणे एखाद्या गोष्टीचा विचार करायला लागेल. व्यवसायात सर्व कामे एकट्याने करण्यापेक्षा योग्य व्यक्तीची योग्य कामासाठी निवड करा. व्यापारानिमित्त प्रवास होईल. हानी होण्याची शक्यता आहे. कुटुंबात मतभेद संभवतात. कुटुंबातील वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. मानसिक त्रास जाणवेल. स्वभावातील चंचलतेवर नियंत्रण ठेवा. प्रवासात विशेष काळजी घ्यावी लागेल.
शुभ रंग: केसरी शुभ दिशा: दक्षिण. शुभ अंकः ०४, ०७.