मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Shiv Sena UBT: ठाकरेंच्या शिवसेनेला प्रचार गीतातून 'जय भवानी' शब्द काढावाच लागणार! निवडणूक आयोगाने काय म्हटले?

Shiv Sena UBT: ठाकरेंच्या शिवसेनेला प्रचार गीतातून 'जय भवानी' शब्द काढावाच लागणार! निवडणूक आयोगाने काय म्हटले?

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Apr 27, 2024 09:45 AM IST

Election Commission of India: निवडणूक आयोगाने ठाकरेंच्या शिवसेनेची 'जय भवानी' शब्दाचा फेरविचार करण्याची विनंती फेटाळून लावली आहे.

निवडणूक आयोगाने ठाकरेंच्या शिवसेनेला त्यांच्या प्रचार गीतातून जय भवानी शब्द काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत.
निवडणूक आयोगाने ठाकरेंच्या शिवसेनेला त्यांच्या प्रचार गीतातून जय भवानी शब्द काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत.

Shiv Sena UBT Campaign Song: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने 'ज्वलंत मशाल' या नव्या चिन्हाच्या प्रचारासाठी गेल्या आठवड्यात प्रचार गीत प्रदर्शित केले. मात्र, यावर निवडणूक आयोगाने आक्षेप घेत प्रचार गीतातील जय भवानी हा शब्द काढण्याचे आदेश दिले. यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेने निवडणूक आयोगाला फेरविचार करण्याची विनंती केली. मात्र, निवडणूक आयोगाने ही विनंती फेटाळून लावली.

शिवसेनेच्या प्रचार गीतामध्ये पक्षप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी ज्वलंत मशाल हातात घेतल्याचे दिसत आहे. तसचे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या सभांचे दृश्य आहे. या प्रचार गीताच्या बॅकग्राऊंडमध्ये 'जय भवानी, जय शिवाजी'चा नारा दिला जात आहे. यामुळे राजकीय जाहिरातींना पूर्वप्रमाणित करणाऱ्या मीडिया सर्टिफिकेशन अँड मॉनिटरिंग कमिटीने म्हणजेच एमसीएमसी रविवारी पक्षाला नोटीस पाठवली.

Uddhav thackeray: आमचे सरकार आल्यानंतर...; ठाकरेंच्या शिवसेनेचा जाहीरनामा प्रसिद्ध, जनतेला काय काय आश्वासन दिली?

निवडणूक आयोगाच्या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले होते की, निवडणूक आयोगाच्या पत्रातील अनुक्रम क्रमांक २.५, यामध्ये पोस्टर्स, व्हिडिओ, ग्राफिक्स, म्युझिक इत्यादींवर कोणत्याही प्रार्थनास्थळाचा किंवा धार्मिक ग्रंथ/ चिन्हे/ स्लोगन वापरण्यावर बंदी घालण्यात आली होती. याच निकषावर निवडणूक आयोगाने ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रचार गीतातील 'हिंदू' आणि 'जय भवानी' या दोन शब्दांचा वापर करण्यास आक्षेप घेतला.

तुळजा भवाई हे महाराष्ट्राचे दैवत आहे. कित्येक वर्ष जय भवानी जय शिवाजी ही घोषणा जनतेच्या हृदयात आहे. म्हणूनच ठाकरेंच्या शिवसेनेने निवडणूक आयोगाला विनंती केली की, हे गाणे त्यांच्या प्रचाराचा भाग बनण्याची परवानगी द्यावी, जे त्यांच्या नवीन चिन्ह ज्वलंत मशालीच्या प्रचारासाठी तयार केले गेले आहे.

Eknath Khadse : एकनाथ खडसे सध्या कोणत्या पक्षात आहेत? राष्ट्रवादी म्हणते, आमच्याकडून गेलेत! भाजप नेते म्हणतात…

निवडणूक आयोगाने विनंती फेटाळली

निवडणूक आयोगाच्या नोटीसनंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपसारख्या इतर पक्षांना प्रभू राम आणि बजरंगबलीचे नाव वापरण्याची परवानगी कशी दिली जाते? आम्हालाच हरकतीची नोटीस कशी मिळाली? असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. त्यांनी निवडणूक आयोगाला आव्हान देत गाणे न बदलण्याचे ठामपणे सांगितले. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला उत्तर देताना निवडणूक आयोगाने ही विनंती फेटाळून लावली. पक्षाने तयार केलेल्या गाण्यावर आम्ही आमच्या आधीच्या नोटीसवर आणि निर्णयावर ठाम आहोत. आमच्या आदेशात फेरबदल करण्याची गरज नाही,' असे निवडणूक आयोगाच्या राज्य शाखेतील एका अधिकाऱ्याने सांगितले.

धार्मिक शब्द किंवा देवतांचे शब्द किंवा नावे वापरण्यास परवानगी नाही

निवडणूक आयोगाने ऑगस्ट २०२३ मध्ये जारी केलेल्या १९ पानांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार त्यांची नोटीस आणि आदेश आहेत, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. आम्ही कोणत्याही शब्दावर आक्षेप घेतलेला नाही किंवा भवानी हा शब्द निर्दिष्ट केलेला नाही. परंतु, धार्मिक शब्द किंवा देवतांचे शब्द किंवा नावे वापरण्यास परवानगी नाही, असे त्यांनी सांगितले. ऑडिओ- व्हिडिओ स्वरूपात प्रचार साहित्याच्या पूर्व-प्रमाणीकरणासाठी एमसीएमसीकडे आलेल्या ३९ प्रकरणांमध्ये नोटिसा बजावण्यात आल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. त्यापैकी पंधरा जणांनी आपला मजकूर सुधारला आहे. तर काहींनी आमच्या नोटिशीला उत्तर दिलेले नाही.

निवडणुकीत धार्मिक शब्दांचा वापर टाळाला

महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना बुधवारी सांगितले की, 'पूर्वप्रमाणपत्रासाठी आमच्याकडे सादर करण्यात आलेल्या प्रचार साहित्यावर आमचा आक्षेप आहे. रॅली आणि सभांमध्ये धार्मिक शब्दांशी संबंधित उच्चार एमसीएमसीच्या अखत्यारित येत नाहीत. आक्षेप घेतल्यास संबंधित अधिकारी योग्य ती कारवाई करतील.

WhatsApp channel