ज्योतिष शास्त्रानुसार, आज शनिवार (२७ एप्रिल) संकष्ट चतुर्थीचा चंद्रमा रवि, शुक्र आणि हर्शलशी षडाष्टक योग करीत असुन मंगळाच्या राशीतुन आणि बुधाचा नक्षत्रातुन गोचर करीत आहे. अशा स्थितीत धनु, मकर, कुंभ आणि मीन या राशींसाठी आजचा दिवस कसा जाईल, ते जाणून घेऊया.
धनु- आज चंद्रभ्रमण पाहता आर्थिक फायदा चांगला होईल. कामाचे उत्तम नियोजन कराल. स्वतंत्र विचाराचा अभिमान बाळगाल परंतु सर्व प्रसंगांना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी लागेल. स्थावर इस्टेटी संबंधी अचानक काही समस्या उद्भवण्याची शक्यता. स्वत:ची कामे स्वतःच केलेली बरी पडतील. मनाजोग्या अनुकुल घटना घडतील. वाहन खरेदीचे योग आहेत. कामकाजात अनुकुल स्थिती राहणार आहे. कुटुंबात वेळेचे नियोजन उत्तम कराल. आपल्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने कामकाजाला सुरुवात करा. निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. व्यापारात वाढ विस्तार होईल.
मकर - आज चंद्र-रवि युतीयोगात दुसऱ्याला समजून घेण्यात थोडे कमी पडाल. प्रकृती स्वास्थ्यात सुधारणा झाली तरी अचानक काही तक्रारी उद्भवल्यामुळे मन:स्वास्थ्य मिळणार नाही. घरात चैनीच्या गोष्टी खरेदी केल्यामुळे खर्चात वाढ होईल. वादविवादामुळे मानसिक त्रास वाढेल. मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न ठेवा. पारिवारिक सहकार्य लाभणार नाही. नातेसंबंधाविषयी मनात कटुता तिरस्कार निर्माण होण्याची शक्यता आहे. व्यापार रोजगातात काही अडचणीचा सामना करावा लागू शकतो. दुरवरचे प्रवास शक्यतो टाळा. अर्थप्राप्तीत अडथळे निर्माण होतील.
कुंभ- आज चंद्र शुभ योगात आपणास मानसिक अवस्था दोलायमान रहाणार असली तरी पूर्वीचा अनुभव तुम्हाला असलेले ज्ञान आणि धडाडी यांच्या जोरावर सर्व गोष्टी तडीस न्याल. घरामध्ये अचानक एखाद्या गोष्टीला तोंड द्यावे लागेल. कौटुंबिक समस्या आणि स्थावर मालमत्ता या संबंधातील समस्या दूर होतील. समाजात मानसन्मान प्रतिष्ठा मिळाल्याने आनंदी राहाल. मत्सर संवाद टाळावा. कोणाचाही द्वेष करू नका. व्यापार उद्योगात वाढ होईल. भागीदारांकडून उत्तम सहकार्य लाभेल.
मीन- आज चंद्राचा रविशी योग होत आहे. धार्मिक गोष्टींमध्ये पैसा खर्च कराल. आपल्या बोलण्यामुळे गैरसमज होत नाहीत ना याचा विचार करून संवाद साधावा. संकटाशी टक्कर देऊन आपले ध्येय गाठण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. आज कुटुंबाची साथ तुम्हाला चांगली मिळणार आहे. वडिलोपार्जित इस्टेटीसंबंधाच्या कामाला गती येईल. कौटुंबिक पातळीवर पत्नी व संततीसी मधुर संबंध राहतील. आकस्मिकरित्या धनलाभाचा योग आहे. सामाजिक कार्यातील व्यक्तींना मोठी पदप्राप्ती मानसन्मान आणि प्रसिद्धी मिळेल.
संबंधित बातम्या