Tips to Get Relief From Rashes in Summer: उन्हाळ्याच्या दिवसात कडक उन्हामुळे त्वचेच्या अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. कडक उन्हामुळे होणारी एक सामान्य समस्या म्हणजे पुरळ किंवा रॅशेस. बहुतेक लोकांना उन्हात बाहेर पडताच लाल पुरळ उठू लागते. असे मानले जाते की हे घामामुळे असू शकते. अशा परिस्थितीत त्वचेची चांगली काळजी घेणे खूप गरजेचे आहे. जर तुम्हाला उन्हामुळे रॅशेस येत असतील तर त्यापासून आराम मिळण्यासाठी तुम्ही ताबडतोब काही पद्धतींचा अवलंब करावा, ज्यामुळे तुम्हाला आराम मिळेल. जाणून घ्या या पद्धती कोणत्या आहेत.
उन्हापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी आपण चांगले सनस्क्रीन वापरणे सर्वात महत्वाचे आहे. सनस्क्रीन तुमच्या त्वचेवर संरक्षण थर म्हणून काम करते. याशिवाय उन्हात बाहेर जाण्यापूर्वी चेहरा स्कार्फने झाका. जर तुमचे हात ओपन असतील तर पूर्ण बाह्यांचा कॉटन शर्ट घालून बाहेर जा.
रॅशेसपासून आराम मिळवण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी चेहऱ्यावर लावाव्या लागतील. येथे आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगत आहोत जे पुरळांवर लावल्यास लगेच आराम मिळेल.
चेहऱ्यावर रॅशेस दिसू लागल्यावर प्रथम केमिकल नसलेल्या क्लिन्झरने चेहरा स्वच्छ करा आणि नंतर मऊ कॉटन टॉवेलने चेहरा पुसून टाका. त्यानंतर एलोवेरा जेल चेहऱ्यावर लावा. तुम्ही ते फ्रिजमध्ये ठेवून थंड करू शकता आणि नंतर चेहऱ्यावर लावू शकता. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही गुलाब पाणीमध्ये एलोवेरा जेल मिक्स करूनही लावू शकता.
तुम्ही चेहऱ्यावर तुरटी देखील लावू शकता. यासाठी तुरटीची पावडर बनवून ती पाण्यात विरघळवून घ्यावी. हे पाणी संक्रमित भागावर लावा. यामुळे त्वचेचा लालसरपणा कमी होऊन त्वरित आराम मिळेल.
चेहऱ्यावर पुरळ उठणे, खाज येणे यासारख्या समस्या असतील तर तुम्ही बर्फ लावू शकता. यासाठी तुमच्या त्वचेला बर्फाच्या तुकड्यांनी मसाज करा. यामुळे त्वचा थंड होईल आणि जळजळ आणि खाज सुटण्यापासून आराम मिळेल. तुम्ही काकडीचा रस आणि एलोवेरा जेल मिक्स करूनही आइस क्यूब बनवू शकता. हे चेहऱ्यासाठी देखील चांगले आहे.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या