Beauty Benefits of Potato Juice: बटाटा उन्हाळ्यात उन्हामुळे जळलेल्या त्वचेचा रंग सुधारू शकतो. उन्हाळ्यात लोकांना अनेकदा सन टॅन, निस्तेज त्वचा, फाइन लाइन्स, डाग आणि पुरळ यासारख्या त्वचेच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. त्वचेशी संबंधित या समस्या दूर करण्यासाठी बटाटा खूप फायदेशीर मानला जातो. बटाटा लोह, व्हिटॅमिन सी आणि रिबोफ्लेविनचा समृद्ध स्रोत आहेत. बटाट्यामध्ये असलेले हे पोषक तत्त्व त्वचेच्या छिद्रांना घट्ट करून अँटी एजिंग फायदे देतात. इतकेच नाही तर बटाट्याचा रस हा एक नैसर्गिक ब्लीचिंग एजंट देखील आहे, जो हट्टी सन टॅन दूर करून आणि त्वचेचा टोन इव्हन करतो आणि त्वचेचा रंग सुधारू शकतो. बटाट्याचा रस चेहऱ्यावर काही दिवस नियमित लावल्यास हायपरपिग्मेंटेशन, त्वचा काळी पडणे, निस्तेज आणि निर्जीव त्वचा यांमध्ये फरक दिसून येतो. बटाट्याचा रस चेहऱ्यावर लावल्याने कोणते फायदे होतात आणि त्वचेवर लावण्याची योग्य पद्धत कोणती आहे ते जाणून घ्या.
उन्हाळ्यात टॅनिंग किंवा पिगमेंटेशनची समस्या लोकांना सर्वात जास्त त्रास देते. त्यामुळे त्वचेचा रंग निस्तेज दिसू लागतो. जर तुम्हालाही तुमची त्वचा काळी पडली आहे असे वाटत असेल तर बटाट्याच्या रसात गुलाब पाणी मिक्स करून लावल्यास फायदा होईल. बटाट्याच्या रसातील व्हिटॅमिन सी रंग सुधारण्यास मदत करू शकते.
मुरुमांच्या हट्टी खुणा चेहऱ्याचे सौंदर्य कमी करत असतील तर बटाट्याच्या रसात गुलाब पाणी मिसळून लावल्याने फायदा होईल. याशिवाय बटाट्याच्या रसात हळद किंवा बेसन मिसळून चेहऱ्याला लावू शकता. बटाट्याच्या रसातील व्हिटॅमिन सी डाग दूर करण्यास मदत करते.
त्वचेवर लावलेल्या बटाट्याचा रस त्वचेचे हायड्रेशन टिकवून ठेवू शकतो. ज्यामुळे त्वचा मऊ आणि कोमल दिसते. त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी तुम्ही बटाट्याचा फेस मास्क चेहऱ्यावर लावू शकता.
चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी बटाट्याचा रस आणि दूध वापरता येते. यासाठी दोन चमचे बटाट्याच्या रसात अर्धा चमचा ग्लिसरीन आणि एक चमचा दूध एकत्र करून मिश्रण तयार करा. हे चेहऱ्यावर लावल्याने सुरकुत्या लवकर कमी होतात आणि त्वचा घट्ट होते.
बटाट्याच्या रसामध्ये असलेले पोषक तत्व सनबर्न आणि उन्हापासून होणारे नुकसान टाळू शकतात. हे त्वचेवर पुरळ, सूज आणि कडक उन्हामुळे होणारा लालसरपणा कमी करून प्रभावित क्षेत्राला थंड आणि शांत करण्यास मदत करते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या