मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Face Pack: बीटरूटचा रस आणि तांदळाच्या पिठापासून बनवा फेस पॅक, तुम्हाला मिळेल गुलाबी ग्लो

Face Pack: बीटरूटचा रस आणि तांदळाच्या पिठापासून बनवा फेस पॅक, तुम्हाला मिळेल गुलाबी ग्लो

Hiral Shriram Gawande HT Marathi
Apr 15, 2024 12:03 PM IST

Pink Glow: तुम्ही बीटरूटचा रस आणि तांदळाचे पीठ वापरून तुमच्या त्वचेचा टोन सुधारू शकता. हा फेस पॅक लावल्याने चेहऱ्यावर गुलाबी चमक येईल. जाणून घ्या गुलाबी ग्लो मिळवण्यासाठी हा फेस पॅक कसा बनवायचा.

Face Pack: बीटरूटचा रस आणि तांदळाच्या पिठापासून बनवा फेस पॅक, तुम्हाला मिळेल गुलाबी ग्लो
Face Pack: बीटरूटचा रस आणि तांदळाच्या पिठापासून बनवा फेस पॅक, तुम्हाला मिळेल गुलाबी ग्लो

Beetroot Juice and Rice Flour Face Pack: स्त्रिया आपली त्वचा स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी वापरतात. पिंपल्स, काळे डाग आणि कोरडी त्वचा तुमचे सौंदर्य खराब करते. पण तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तुमची त्वचा निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही घरीच फेस पॅक तयार करू शकता. यासाठी तुम्हाला ४ गोष्टींची आवश्यकता असेल. ज्यामध्ये तांदळाचे पीठ आणि बीटरूटचा रस आवश्यक आहे. या घरगुती फेस पॅकमुळे त्वचा चमकदार आणि छान दिसू लागते. विशेष म्हणजे हा फेस पॅक एकदाच वापरल्याने तुम्हाला पिंक ग्लो मिळू शकतो. चला तर मग वाट कसली पाहताय जाणून घ्या कसा बनवायचा बीटरूटचा रस आणि तांदळाच्या पीठाचा हा फेस पॅक.

ट्रेंडिंग न्यूज

गुलाबी ग्लोसाठी फेस पॅक

हा घरगुती फेस पॅक बनवण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे -

- एक चमचा एलोवेरा

- एक चमचा तांदळाचे पीठ

- एक चमचा बीटरूटचा रस

- अर्धा चमचा तीळ

कसा बनवायचा फेस पॅक

हा फेस पॅक बनवण्यासाठी एक ताजे कोरफड घ्या आणि नंतर त्याचे चार कोपरे कापून टाका. त्यातील कोरफडीचे गर म्हणजेच जेल काढा आणि बाजूला ठेवा. आता तांदळाचे पीठ, बीटरूटचा रस आणि तीळ एकत्र मिक्स करा. या मिश्रणात एलोवेरा जेल घाला आणि ब्लेंडरमध्ये टाका आणि चांगले ब्लेंड करा. आता तुमचा फेस पॅक चेहऱ्यावर लावण्यासाठी तयार आहे.

कसा लावायचा फेस पॅक

जर तुम्ही त्वचेवर गुलाबी चमक आणण्यासाठी हा फेस पॅक लावत असाल तर आधी चेहरा स्वच्छ करा. त्यानंतर हा फेस पॅक समान रीतीने चेहऱ्यावर लावा. किमान १५ मिनिटे असेच राहू द्या. ठराविक वेळेनंतर चेहरा धुवा. नंतर चेहऱ्यावर बदामाचे तेल किंवा तुमचे आवडते सिरम लावा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग