Face Pack for Pimples: उन्हाळ्यात चेहऱ्याला जास्त घाम येऊ लागतो. यासोबतच ऑइल ग्रंथीही सक्रिय होतात. त्यामुळे धूळ आणि घाण त्वचेकडे आकर्षित होतात आणि पिंपल्स दिसू लागतात. उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच त्वचेची योग्य काळजी घेतली तर हे पिंपल्स कमी होऊ शकतात. याशिवाय पिंपलचे मार्क्स सुद्धा कमी होतील. पिंपल्स कमी करण्यासाठी तुळस, कडुलिंब आणि मुलतानी मातीचा फेस पॅक घरीच तयार करा आणि अशा प्रकारे लावा. त्याचा परिणाम दुसऱ्या दिवसापासून दिसून येईल.
उन्हाळ्यात पिंपल्सची समस्या कमी होण्यासाठी हा फेस पॅक खूप उपयुक्त आहे. हा फेस पॅक बनवण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे -
- एक चमचा कडुलिंबाची पावडर
- एक चमचा मुलतानी माती
- ४-५ तुळशीची पाने
- एक चमचा दही
- एक चमचा मध
- दोन थेंब टी ट्री ऑइल
हा खास फेस पॅक बनवण्यासाठी सर्वप्रमथ एका काचेच्या बाउलमध्ये कडुलिंब पावडर आणि मुलतानी माती घ्या. तुळशीची पाने बारीक करून त्यात मिक्स करा. जेणेकरून तुळशीच्या पानांचा रस मिळू शकेल. आता त्यात दही आणि मध घालून चांगले मिक्स करा. तसेच टी ट्री ऑइलचे एक ते दोन थेंब घाला. आता हे सर्व काही चांगले मिक्स करा.
हा फेस पॅक चेहऱ्यावर लावण्यापूर्वी सर्वप्रथम चेहरा नीट धुवा. नंतर चेहरा कोरडा करून तयार केलेला फेस पॅक लावा. हा फेस पॅक चेहऱ्यावर साधारण अर्धा तास तसाच राहू द्या. नंतर पाण्याने धुवा. आठवड्यातून दोन ते तीन दिवस हा फेस पॅक लावल्याने पिंपल्सपासून आराम मिळेल. आणि मुरुमांच्या खुणा देखील कमी होऊ लागतील.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या