मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Summer Skin Care: चेहऱ्यावर ड्राय पॅचेस दिसत असतील तर लावा हा फेस पॅक, त्वचेवर येईल चमक

Summer Skin Care: चेहऱ्यावर ड्राय पॅचेस दिसत असतील तर लावा हा फेस पॅक, त्वचेवर येईल चमक

Hiral Shriram Gawande HT Marathi
Apr 13, 2024 10:57 AM IST

Skin Dryness in Summer: त्वचेचा कोरडेपणा फक्त हिवाळ्यातच होत नाही तर उन्हाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता देखील त्वचेवर दिसू लागते. त्वचेचे डिहायड्रेशन झाल्यामुळे ड्राय पॅचेस येतात. ज्यावर तुम्ही हा फेस पॅक लावू शकता.

Summer Skin Care: चेहऱ्यावर ड्राय पॅचेस दिसत असतील तर लावा हा फेस पॅक, त्वचेवर येईल चमक
Summer Skin Care: चेहऱ्यावर ड्राय पॅचेस दिसत असतील तर लावा हा फेस पॅक, त्वचेवर येईल चमक (unsplash)

Flax Seed Face Pack for Dry Skin: उन्हाळ्यातही त्वचेवर कोरडेपणा येऊ शकतो. अनेकदा कोरडे, उष्ण वारे त्वचा निर्जीव करतात. त्यामुळे त्वचेवर ड्राय पॅचेस दिसू लागतात. हे पॅचेस अनेकदा हलके ते लाल रंगाचे दिसतात आणि त्वचा पूर्णपणे कोरडी दिसते. त्यामुळे चेहराही पूर्णपणे निस्तेज दिसतो. जर तुम्हाला एप्रिलच्या मोसमात तुमच्या चेहऱ्यावर असा कोरडेपणा जाणवत असेल तर हा फेस पॅक लावा. हे प्रभावीपणे त्वचा मऊ आणि चमकदार बनविण्यात मदत करेल. तर जाणून घ्या त्वचेचा कोरडेपणा दूर करून ग्लोइंग त्वचा देणारा फेस पॅक कसा बनवायचा.

ट्रेंडिंग न्यूज

कोरड्या त्वचेसाठी फेस पॅक

उन्हाळ्यात त्वचा कोरडी होण्याचे कारण डिहायड्रेशन असते. त्वचेमध्ये पाण्याच्या कमतरतेमुळे त्वचा पूर्णपणे कोरडी होते. अशा परिस्थितीत भरपूर नारळ पाणी, लिंबू पाणी आणि सामान्य पाणी पिण्यासोबतच हा फेस पॅक चेहऱ्यावर लावा.

कसा बनवायचा फेस पॅक

फेस पॅक बनवण्यासाठी तुम्हाला फ्लेक्स सीड्स, संत्र्याचा रस आणि बदामाचे तेल लागेल. फ्लेक्स सीड्स बारीक करून त्याची पावडर बनवा आणि हवाबंद डब्यात ठेवा. जेणेकरून कधीही लगेच फेस पॅक बनवता येईल.

हा फेस पॅक बनवण्यासाठी एका बाउलमध्ये एक चमचा फ्लेक्स सीड्सची पावडर घ्या. त्यात ताजे पिळून काढलेला संत्र्याचा रस घाला. एक चमचा बदाम तेल घालून पेस्ट तयार करा. हा फेस पॅक चेहऱ्यावर लावण्यासाठी प्रथम चेहरा नीट धुवा. चेहरा कोरडा केल्यानंतर तयार केलेला फेस पॅक लावा. हा फेस पॅक चेहऱ्यावर साधारण २० मिनिटे राहू द्या. ते सुकल्यावर पाण्याने चेहरा धुवा. आणि त्वचेला साजेसे कोणतेही मॉइश्चरायझर लावा.

फेस पॅक लावण्याची पद्धत

हा फेस पॅक आठवड्यातून तीन वेळा लावा. काही दिवसांनी चेहऱ्यावर ग्लो दिसू लागेल. हा फेस पॅक त्वचेला मऊ आणि गुळगुळीत करतो आणि आतून हायड्रेट देखील करतो. तसेच ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स आणि डेड स्किन दूर करते. ज्यामुळे चेहऱ्यावर चमक दिसू लागते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel