Face Pack With Leftover Rice: चमकदार, स्वच्छ आणि गोरी त्वचा असवी असे प्रत्येक स्त्रीला वाटते. या प्रकारची त्वचा मिळविण्यासाठी स्त्रिया नियमित स्किन केअर रुटीन देखील फॉलो करतात. तर काही महिला पार्लरमध्ये महागडे ट्रीटमेंट करून घेतात. त्वचा स्वच्छ ठेवण्यासाठी तुम्हाला पार्लरला जाण्याची गरज नाही. त्वचा स्वच्छ ठेवण्यासाठी तुम्ही घरी उरलेला भात देखील वापरू शकतात. स्किन केअरसाठी शिजवलेला भात आणि कच्चे तांजूळ दोन्ही वापरता येतात. कोरियन स्त्रिया देखील ग्लास स्किन मिळविण्यासाठी तांदूळ वापरतात. त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासाठी आणि रंग निखळण्यासाठी उरलेल्या भातापासून फेस पॅक बनवा. येथे जाणून घ्या उरलेल्या भातापासून फेस पॅक कसे बनवता येते.
- उरलेला भात
- बेसन
- कॉफी
- मसूर डाळ
- संत्र्याचा रस
फेस पॅक बनवण्यासाठी शिजवलेला भात ब्लेंडरमध्ये टाका आणि चांगले ब्लेंड करा. नंतर त्यात मसूर डाळ घाला आणि पुन्हा चांगले ब्लेंड करा. दोन्ही गोष्टींची पेस्ट झाल्यावर ते एका भांड्यात काढा. आता त्यात बेसन, कॉफी आणि संत्र्याचा रस मिक्स करा. नीट फेटून घ्या म्हणजे त्यात गुठळ्या राहणार नाहीत. गुळगुळीत पेस्ट तयार करा.
फेस पॅक लावण्यासाठी आधी चेहरा पूर्णपणे धुवा आणि पुसून टाका. त्यानंतर हा फेस पॅक चेहऱ्यावर समान रीतीने लावा आणि मसाज करा. चेहऱ्याला नीट मसाज केल्यानंतर फेस पॅक काही वेळ तसाच राहू द्या. साधारण १५ ते २० मिनिटे चेहऱ्यावर राहू द्या आणि नंतर त्वचा स्वच्छ करा. या फेस पॅकच्या मदतीने चेहऱ्यावरील घाण आणि ब्लॅक हेड्स सहज दूर होतील.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या