मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Summer Skin Care: कडक उन्हातही टिकून राहील त्वचेचे सौंदर्य, हायड्रेशनसाठी फॉलो करा या गोष्टी

Summer Skin Care: कडक उन्हातही टिकून राहील त्वचेचे सौंदर्य, हायड्रेशनसाठी फॉलो करा या गोष्टी

Hiral Shriram Gawande HT Marathi
Apr 26, 2024 03:40 PM IST

Skin Hydration: उन्हाळ्यात त्वचेच्या अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. पण या काळात त्वचेचे सौंदर्य टिकवण्यासाठी या नैसर्गिक पद्धतींचा अवलंब करा. याने त्वचा हायड्रेट राहते.

Summer Skin Care: कडक उन्हातही टिकून राहील त्वचेचे सौंदर्य, हायड्रेशनसाठी फॉलो करा या गोष्टी
Summer Skin Care: कडक उन्हातही टिकून राहील त्वचेचे सौंदर्य, हायड्रेशनसाठी फॉलो करा या गोष्टी (unsplash)

Tips to Hydrate Skin in Summer: कडक उन्हात आपल्या त्वचेचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी महिलांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. अशा परिस्थितीत त्वचेची अतिरिक्त काळजी घेणे आवश्यक आहे. वास्तविक या ऋतूमध्ये घाम, धूळ आणि प्रदूषणामुळे त्वचेशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे त्वचेमध्ये ओलावा कमी होऊ शकतो. अशा परिस्थितीत त्वचेला हायड्रेट करण्यासाठी तुम्ही काही नैसर्गिक पद्धतींचा अवलंब करू शकता. या गोष्टी फॉलो केल्याने त्वचा नैसर्गिकरित्या हायड्रेट राहील आणि उन्हाळ्यात त्वचा देखील चांगली राहील.

ट्रेंडिंग न्यूज

हायड्रेशन राखण्यासाठी नैसर्गिक मार्ग

फेस पॅक लावा

त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही फेस पॅक देखील बनवू शकता. यासाठी एका भांड्यात एक चमचा मध घ्या आणि त्यात गुलाब पाणी घाला. हा फेस पॅक बनवण्यासाठी या दोन गोष्टी नीट मिक्स करा. आता ते चेहऱ्यावर लावा आणि साधारण १५ ते २० मिनिटे चेहऱ्यावर राहू द्या. नंतर चेहरा पूर्णपणे स्वच्छ करा. थंड पाण्याने चेहरा धुवा आणि नंतर फेस सीरम लावा.

पाणी असलेले फळे खा

त्वचेचे हायड्रेशन राखण्यासाठी पाण्याचे प्रमाण चांगले असलेले फळे खावीत. तथापि जास्त गोड फळे खाऊ नका. अन्यथा यामुळे त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात.

हे जेल त्वचेवर ओलावा राखेल

त्वचेवर ओलावा टिकवून ठेवण्यासाठी चेहऱ्यावर जेल लावा. हे जेल तुम्ही घरी तयार करू शकता. यासाठी एका वाटीत एक किंवा दोन चमचे व्हिटॅमिन ई कॅप्सूल आणि एलोवेरा जेल मिक्स करा. आता हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. खूप चिकट वाटत असल्यास काही वेळाने चेहरा पाण्याने धुवा.

भरपूर पाणी प्या

उन्हाळ्यात त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी पुरेसे पाणी पिणे फार महत्वाचे आहे. दिवसातून २ लिटर पाणी प्यायल्यास चेहऱ्याची जळजळ, पुरळ आणि मुरुम टाळता येऊ शकतात. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात भरपूर पाणी प्यावे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel