मराठी इंडस्ट्रीला सध्या सुगीचे दिवस आल्याचे पाहायला मिळत आहेत. एकापाठोपाठ एक असे वेगवेगळ्या विषयांवर आधारित सुपरहिट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. २०२३ हे वर्ष तर मराठी इंडस्ट्री आणि कलाकारांसाठी खास ठरले. या वर्षात एकापाठोपाठ एक हिट ठरलेल्या चित्रपटांच्या यादीमधील 'बाईपण भारी देवा' हा चित्रपट आता घर बसल्या प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. जाणून घ्या कधी आणि कुठे पाहाता येणार...
बाईपण भारी देवा चित्रपटाने २०२३ हे वर्ष चांगलेच गाजवले होते. फक्त महिला वर्गच नाही तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकानेच या सिनेमा पाहिला आणि त्यावर भरभरुन प्रेम केले. या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर, सुकन्या मोने आणि दीपा परब या अभिनेत्रींनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. या सर्व अभिनेत्रींवर कौतुकाचा वर्षाव झाला.
वाचा: पोझ देत असताना जोरात वारा आला अन्...; ऊप्स मोमेंटची शिकार झाली हृतिकची पूर्व पत्नी सुझान खान
मंगळागौर स्पर्धा जिंकण्यासाठी सहा बहिणींची होणारी तारेवरची कसरत आणि ही कसरत करता करता बहिणींमधले खुलत जाणारे नाते चित्रपटात दाखवण्यात आले आहे. या चित्रपटाची कथा शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. तसेच चित्रपटात डान्स करण्यासाठी वयाची बंधने नसतात हे दाखवून दिले आहे. तसेच चित्रपटाती संवाद हे कायमच सर्वांचे लक्ष वेधले आहे.
वाचा: ट्रेंडमध्ये असलेले 'गुलाबी साडी' हे गाणे कोणी गायले आणि कसे सुचले माहिती आहे का? जाणून घ्या
बॉक्स ऑफिस गाजवणारा महाराष्ट्राचा हा लाडका 'बाईपण भारी देवा' चित्रपट महाराष्ट्राच्या नंबर वन वाहिनीवर पहाता येणार आहे. १९ मे ला सायंकाळी ७ वाजता स्टार प्रवाहवर ‘बाईपण भारी देवा’चा वर्ल्ड टेलिव्हिज प्रीमियर होणार आहे.
वाचा: थिएटरमधील चित्रपटात आता जाहिरातींचा अडथळा नाही! पीव्हीआर आयनॉक्सचा मोठा निर्णय; काय आहे कारण?
‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. जवळपास चित्रपटाने जगभरात ९२ कोटी रुपयांची कमाई केल्याची माहिती समोर आली होती. हा चित्रपट १३ ऑगस्ट २०२३ रोजी प्रदर्शित झाला होता. ४५ दिवसात चित्रपटाने ८९ कोटी रुपयांची कमाई केली होती. आता हा चित्रपट प्रेक्षकांना घर बसल्या पाहाता येणार आहे.
संबंधित बातम्या