मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Water Cut : तारीख लक्षात ठेवा! मुंबईतील बोरिवली, कांदिवली परिसरात ३ मे रोजी पाणीपुरवठा बंद राहणार

Mumbai Water Cut : तारीख लक्षात ठेवा! मुंबईतील बोरिवली, कांदिवली परिसरात ३ मे रोजी पाणीपुरवठा बंद राहणार

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Apr 27, 2024 11:56 AM IST

Kandivali Borivali Water Cut : येत्या ३ मे रोजी बोरिवली आणि कांदिवली परिसरातील पाणीपुरवठा बंद राहील.

कांदिवली आणि बोरिवली परिसरात ३ मे रोजी पाणीकपात केले जाणार आहे.
कांदिवली आणि बोरिवली परिसरात ३ मे रोजी पाणीकपात केले जाणार आहे.

BMC: मुंबई महानगरपालिका मिठी चौकी जंक्शन (Mithi chowky junction) ते महावीर नगर जंक्शनदरम्यानची (Mahavir Nagar Junction) पाईपलाईन बदलण्याचे काम हाती घेणार आहे. या कामाला २ मे २०२४ रोजी रात्री १० वाजल्यापासून सुरुवात होईल. हे काम २४ तासांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. या कालावधीत कांदिवली (Kandivali) आणि बोरिवलीच्या (Borivali) काही भागात ३ मे रोजी पाणीपुरवठा (Water Supply) बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले.

महावीर नगरमध्ये १२०० मिमीची जुनी पाइपलाइन बदलून नवीन पाइपलाइन टाकण्यात येणार आहे. पाईपलाईन बदलण्याचे काम २ मे रोजी रात्री १०.०० ते ३ मे रोजी रात्री १० वाजेपर्यंत पूर्ण केले जाईल.  या कालावधीत पाइपलाइन रिकामी केली जाईल. यामुळे बोरिवली, कांदिवलीत ३ मे रोजी पाणीपुरवठा राहणार बंद ठेवण्यात येणार आहे. हे काम वेळत पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.

Dharavi Redevelopment Project: धारावी पुनर्विकास प्रकल्पातून बेस्टला अतिरिक्त ५० कोटी मिळणार!

कोणकोणत्या भागात पाणीपुरवठा बंद राहणार?

एन आर दक्षिण विभाग: जनकल्याण नगर, छत्रपती शिवाजी राजे संकुल, म्हाडा वसाहत, लालजीपाडा, के.डी. पंपाऊंड, गांधी नगर, संजय नगर, बंदर पखाडी, भाबरेकर नगर, सरकारी ओद्योगिक वसाहत, चारकोप गाव, एकता नगर, महावीर नगर, इराणीवाडी, कांदिवली गावठाण, महात्मा गांधी मार्ग, शंकर गल्ली, मथुरदास मार्ग, शांतिलाल मोदी मार्ग, खजुरिया टैंक मार्ग, अडुक्रिया मार्ग व आर दक्षिण विभाग हद्दीतील स्वामी विवेकानंद मार्ग

Weather Updates: मुंबई, ठाणे, पालघरसह 'या' जिल्ह्यांत उष्णता वाढणार; १० जिल्ह्यांना पावसाचा इशारा

एन आर दक्षिण व आर मध्य विभाग: चारकोप म्हाडा, आर दक्षिण विभाग पोईसर, महावीर नगर, इंदिरा नगर, बोरसापाडा मार्ग, स्वामी विवेकानंद मार्ग.

एन आर मध्य विभाग: शिंपोली, महावीर नगर, सत्या नगर, वझिरा नाका, बाभई, जयराज नगर, एक्सर, सोडावाला गल्ली, योगी नगर, रोकडिया गल्ली, सरदार वल्लभभाई पटेल मार्ग, पोईसर व आर दक्षिण विभाग हद्दीतील स्वामी विवेकानंद मार्ग.

या कालावधीत नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल मुंबई महानगरपालिकेने दिलगिरी व्यक्त केली. तसेच नागरिकांनी पुढील चार ते पाच दिवसांत पाणी फिल्टर करून उकळून प्यावे, असे आवाहन केले.

IPL_Entry_Point

विभाग