ज्योतिष शास्त्रानुसार, आज शनिवार (२७ एप्रिल) संकष्ट चतुर्थीचा चंद्रमा रवि, शुक्र आणि हर्शलशी षडाष्टक योग करीत असुन मंगळाच्या राशीतुन आणि बुधाचा नक्षत्रातुन गोचर करीत आहे. अशा स्थितीत राशीचक्रातील पहिल्या चार राशींसाठी आजचा दिवस कसा जाईल, हे जाणून घेऊया.
मेष - आज चंद्र रवि संयोगात प्रत्येक काम फत्ते करणार आहात. संयमाची कसोटी तुम्हाला सांभाळावी लागेल. प्रेमळ आणि परोपकारी वृत्तीमुळे अनेक लोक जोडले जातील. कुटुंबातील व्यक्तींचे उत्तम सहकार्य मिळेल. कामाचे नियोजन केले तरी त्याची कार्यवाही न केल्या मुळे कामे उलटपालट होऊन जातील. रागाचा पारा एकदम चढल्यामुळे जवळचे लोक संभ्रमात पडतील. इस्टेटीतून वारसाहक्कातुन धनलाभ संभवतो. आधुनिक वस्तुंचा लाभ होईल. व्यापारात जुनी येणी वसूल होतील. नातेवाईक आप्तेष्टांकडून सहकार्य लाभेल.
शुभ रंगः केसरी शुभ दिशाः दक्षिण. शुभ अंकः ०२, ०९.
वृषभ- आज योग चांगले आहेत. तुमच्या कामाचा वेग आणि धाडस वाखाणण्यासारखे असेल. व्यवहारात कोणत्या वेळी कसे निर्णय घ्यावे याची जाण येईल. धंद्यात चांगली प्रगती कराल. लहानात लहान होऊन आणि मोठ्यात मोठे होऊन रमून जाल. त्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहील. धाडसी निर्णय घ्याल. कुटुंबातील सदस्याचे सहकार्य घ्या. व्यापारात अती उत्साहीपणाने निर्णय घेऊ नका. धनलाभाचा योग आहे. भांवडाकडून आर्थिक सहकार्य लाभेल. कौटुंबिक पातळीवर पत्नी व संततीसी मधुर संबंध राहतील.
शुभ रंग: गुलाबी शुभ दिशा: वायव्य. शुभ अंकः ०४, ०६.
मिथुन- आज चंद्रबल उत्तम असल्याने उत्तम नियोजना मुळे नोकरीत कौतुकास पात्र ठराल. व्यवसायात कष्ट जास्त पण त्यामानाने पैसा मात्र लगेच दृष्टी पडणार नाही. कलाकारांना आपली कला लोकांसमोर सादर करण्याची संधी मिळेल. उत्तम कलाकृतीसाठी कौतुकास पात्र ठराल. फायदा तोटा बाजूला ठेवला तरी धंद्यामध्ये तुमच्या बुद्धीची झलक आणि योग्य समयसूचकता दिसून येईल. व्यापारात वाढ करणारा दिवस राहिल. आत्मविश्वासपूर्ण वाटचाल करावी. कौटुंबिक जिवन अनुकुल राहणार आहे. जोडीदाराचे सहकार्य लागेल. नातेवाईक आप्तेष्ट यांची साथ मिळेल. आर्थिक उलाढालीतून फायदा होईल. सहकाऱ्यांसोबतचे वाढविवाद मात्र टाळावे.
शुभ रंगः हिरवा शुभ दिशाः उत्तर. शुभ अंकः ०३, ०६.
कर्क - आज चंद्र गोचर शुभ स्थानातून होत आहे. नवीन चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर नोकरी बदलाचे योग आहेत. व्यवसायात दुसरा एखादा व्यवसाय चालू करण्याची शक्यता आहे. शेअर मार्केट मध्ये पैसा मिळेल. बौद्धीक आणि कलेच्या क्षेत्रात उत्तम प्रगती आणि नावलौकिक लाभेल. खरेदी विक्रीच्या व्यवहारात आर्थिक लाभ होईल. आहारावर नियंत्रण ठेवणे गरजेच आहे. फाजिल आत्मविश्वासाचा अतिरेक करणे टाळा. प्रेमसंबंधात भावनेवर नियंत्रण ठेवा. व्यापारात आर्थिक लाभाची सुखद संधी मिळेल.
शुभ रंगः पांढरा शुभ दिशाः वायव्य. शुभ अंकः ०२, ०७.