(2 / 12)मेषः आज चंद्र रवि संयोगात प्रत्येक काम फत्ते करणार आहात. संयमाची कसोटी तुम्हाला सांभाळावी लागेल. प्रेमळ आणि परोपकारी वृत्तीमुळे अनेक लोक जोडले जातील. कुटुंबातील व्यक्तींचे उत्तम सहकार्य मिळेल. कामाचे नियोजन केले तरी त्याची कार्यवाही न केल्या मुळे कामे उलटपालट होऊन जातील. रागाचा पारा एकदम चढल्यामुळे जवळचे लोक संभ्रमात पडतील. नवीन योजनेच्या दृष्टीने लाभदायक दिवस आहे. इस्टेटीतून वारसाहक्कातुन धनलाभ संभवतो. आधुनिक वस्तुंचा लाभ होईल. व्यापारात जुनी येणी वसूल होतील. नातेवाईक आप्तेष्टांकडून सहकार्य लाभेल. सार्वजनिक कामात आपला नावलौकिक वाढेल. अध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तिंच्या भेटी घडतील. कार्य पद्धतीवर लक्ष केंद्रित केल्यास अनपेक्षीत लाभ होतील. नातेवाईकां कडून आर्थिक मदत मिळेल. मुलांच्या प्रगतीमुळे प्रसन्न वातावरण राहणार आहे. परदेश प्रवास होण्याची शक्यता आहे.शुभरंगः केसरी शुभदिशाः दक्षिण.शुभअंकः ०२, ०९.