बॉलिवूड स्टार आणि विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माने नुकताच (१ मे) तिचा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने कोहलीने एका खास पार्टीचे आयोजन केले होते. यात फक्त त्यांचे जवळचे मित्र सहभागी झाले होते.
विराट कोहलीने ज्या हॉटेलमध्ये डिनर पार्टी आयोजित केली होती. आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने या डिनरचे फोटो शेअर केले आहेत.
खरंतर डु प्लेसिस आणि मॅक्सवेलने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे. यामध्ये विराट आणि अनुष्कासोबत मॅक्सवेल आणि डुप्लेसिसही दिसत आहेत. या पार्टीत मॅक्सवेलची पत्नीही सहभागी झाली होती. त्यांच्याशिवाय आणखी एक व्यक्ती डिनर पार्टीत सहभागी झाली होती. रिपोर्ट्सनुसार तो कोहलीचा मित्र आहे. फोटोत डिनर टेबलच्या मध्यभागी कोहली आणि अनुष्का बसलेले दिसत आहेत.
कोहलीने अनुष्कासाठी तिच्या वाढदिवसानिमित्त बंगळुरूमधील लुपा हॉटेलमध्ये डिनरचे आयोजन केले होते. हे शेफ मनु चंद्रा यांचे हॉटेल आहे. अनुष्काचा वाढदिवस स्पेशल करण्यासाठी हॉटेलने मेनू कार्डवर तिचे नावही लिहिले होते. याचे फोटोही सोशल मीडियावर शेअर करण्यात आले होते.
अनुष्का आणि कोहलीचे २०१७ मध्ये लग्न झाले होते. अनुष्का आणि कोहलीला दोन मुलेही आहेत. याआधी अनुष्काने एका मुलीला जन्म दिला होता. तिचे नाव वामिका आहे. यानंतर दोघांना एक मुलगा झाला. मुलाचे नाव अकाय ठेवण्यात आले आहे.
कोहली सध्या आयपीएल खेळण्यात व्यस्त आहे. तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळतो. यामुळे बंगळुरूमध्येच डिनरचे आयोजनही करण्यात आले होते. आरसीबीचे सर्व खेळाडू सध्या बंगळुरूमध्ये आहेत.
कोहलीची टीम आरसीबीने आयपीएल २०२४ मध्ये निराशाजनक कामगिरी केली आहे. आरसीबीने १० सामने खेळले आहेत आणि फक्त ३ जिंकले आहेत. त्यांना ७ सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. आरसीबीने गेल्या दोन सामन्यांमध्ये सलग विजय नोंदवले आहेत. त्यांनी गुजरात आणि हैदराबादचा पराभव केला आहे.
संबंधित बातम्या